Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा सुरुवातीला लवकर झालेल्या पावसाने खरिपात क्षेत्र वाढेल असा अंदाज होता. मात्र मध्यंतरी पावसाच्या झालेल्या खंडाचा पेरणीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. .यंदा आतापर्यंत सरासरीच्या ९७ टक्के पेरणी झाली आहे. आता पेरणीचा कालावधी संपला आहे. यंदा आतापर्यंत झालेल्या पेरणीचा विचार करता प्राप्त बियाणांतील ९ हजार ५०२ क्विटंल बियाणे शिल्लक राहिले आहे..Kharif Season : पावसाची उघडीप, आंतरमशागतीस वेग.अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाचे ५ लाख ६२ हजार ०२१ हेक्टर सरासरी क्षेत्र असून यंदा आतापर्यंत ६ लाख ९३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. दरवर्षी बियाणे बदलाचे प्रमाण लक्षात घेऊन व मागणी तीन वर्षांत झालेल्या पेरणी आणि बियाणे विक्रीच्या टक्केवारीचा विचार करून खरिपात पेरणीसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून बियाणांची मागणी केली जाते..मागणीनंतर बियाणे उपलब्धता आणि विक्री याचा ताळमेळ घातला जातो. यंदा खरिपाची पेरणी कालावधी संपला आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला लवकर पाऊस झाल्याने यंदा पेरणी सरासरीपेक्षा अधिक होईल, असा अंदाज असताना मध्यंतरी पेरणीला वेग येण्याच्या कालावधीतच पावसाचा खंड पडला. .Kharif Season : वाढीस लागलेली पिके टाकू लागली माना.त्याचा पेरण्यावर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा सार्वजनिक १० हजार ९०४ क्विंटल व खासगी ६५ हजार ६७२ क्विंटल असे ७९ हजार ७३६ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले होते. त्यातील आतापर्यंत ७० हजार २३४ क्विंटल बियाणे शिल्लक राहिले आहेत. यंदा सोयाबीनचे सर्वाधिक बियाणे शिल्लक राहिले असल्याचे सांगण्यात आले..पीकनिहाय बियाणेविक्री क्विंटल(कंसात उपलब्ध बियाणे)भात ५१०० (५३३७)बाजरी २६०० (२९००)मका ः ११,९२८ (१३,०१२)तूर ः ३६२० (३८२२)मूग ः १९६८ (२८१९)उडीद ः ७१०२ (७३२४)सोयाबीन ः ३५,६०२ (४६,६२७)कापूस ः २३१५ (२८९३).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.