Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्ग) साठी राखीव निघाले आहे. त्यामुळे पंचवीस वर्षानंतर या प्रवर्गासाठी आणि त्यातही महिलेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. त्यामुळे कोणता जिल्हा परिषद गटात अनुसूचित जमातीचे आरक्षण पडतेय याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडणाऱ्या आदिवासींची संख्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अधिक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यावेळी अकोले तालुक्याला जाण्याची शक्यता आहे..ग्रामीण भागासाठी महत्त्वाच्या असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पंचवाषिक निवडणूका पाच वर्षांपासून झालेल्या नाहीत. पाच वर्षाच्या प्रशासकराज नंतर आता या निवडणूका घेण्याची प्रशासनाची तयारी सुरु आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे गणांची रचना केली. दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण काढण्यात आले आहे. .जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्ग) साठी राखीव झाले आहे. या संवर्गातील सर्वाधिक लोकसंख्या ही एकट्या अकोले तालुक्यात आहे. शिवाय राहुरी, कोपरगाव, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर तालुक्यातही अनुसूचित जमातीची लोकसंख्या बऱ्यापैकी आहे. महादेव कोळी, ठाकर, भिल्ल, कातकरी, पारधी, मल्हार कोळी, वारली, गोंड, कोकणा, मालधारी, पावरा समाजातून निवडून येणाऱ्या महिला उमेदवाराला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. .अहिल्यानगरला जिल्हा परिषदेच्या ७५ गटांचे आरक्षण काढले जाईल. या गटापैकी जिल्ह्यात अनुसूचित जमातीचे ८ गट राखीव असतील. त्यातून चार जागा या महिलांसाठी राखीव राहणार आहेत. त्यातूनच एका महिलेला अध्यक्षपदाची संधी आहे.अकोल्यात अधिक गट राखीव असणार असल्याने अकोले तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळण्याची आशा लागली आहे..Ahilyanagar ZP : अहिल्यानगर ‘झेडपी’तील गैरव्यवहाराची पाच सदस्यीय समिती करणार चौकशी.अकोलेत सभापती एसटी महिलेसाठी राखीवअहिल्यानगर जिल्ह्यात पंचायत समितीच्या १४ सभापतीपदासाठीचे आरक्षणही काढण्यात आले. अकोलेचे सभापतीपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असून उर्वरित अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाती महिलेसाठी प्रत्येकी १, ओबीसीसाठी २, ओबीसी महिलेसाठी २, सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३ आणि सर्वसाधारण प्रवर्ग महिलेसाठी ३ ठिकाणी सभापतीपद राखीव असेल..Ahilyanagar ZP :अण्णासाहेब शिंदे सभागृहावर बुलडोझर; झेडपीच्या वारशावर घाला.पंचवीस वर्षानंतर ‘संधी’अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्गासाठी) जिल्हा परिषद स्थापनेपासून दुसऱ्यांदा संधी मिळत आहे. जिल्हा परिषदेची १९६२ ला स्थापन झाल्यानंतर १९९८-९९ मध्ये अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यानंतर स्व. अशोकराव भांगरे अध्यक्ष झाले. वर्षभर ते अध्यक्ष होते. त्यानंतर आता पंचवीस वर्षांनी दुसऱ्यांदा तर अनुसूचित जमातीमधील महिलेला पहिल्यांदा संधी मिळतेय. त्यामुळे हा मान कोणाला मिळणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे..पाच वेळा महिला अध्यक्षअहिल्यानगर जिल्हा परिषद स्थापनेपुर्वी लोकल बोर्ड होते. हिराबाई भापकर यांनी लोकल बोर्डाचे अध्यक्षपद भूषवले. राशीन (ता. कर्जत)च्या डॉ. विमल ढेरे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्या. अनेक वर्षानंतर २००७ मध्ये शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील पाच वर्ष, त्यानंतर २०१४ पासून तीन वर्ष कुळधरणच्या (ता.कर्जत) मंजूषा राजेंद्र गुंड अध्यक्ष होत्या. शालिनीताई विखे पुन्हा २०१७ पासून तीन वर्ष अध्यक्ष राहिल्या. दहिगावने (ता. शेवगाव) येथील राजश्री चंद्रशेखर घुले पाटील या अडीच वर्ष अध्यक्ष होत्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.