Ahilyanagar News : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून यंदा स्वनिधीतून जिल्हाभरातील मागासवर्गीय १२७२ मुला-मुलींना शाळेत जाण्या-येण्यासाठी सायकली घेण्याला प्रत्येकी ६ हजार ५० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. याशिवाय मागासवर्गीय शेतकऱ्यांना स्प्रिंकलर, स्पेपंप घेण्याला अनुदान मिळणार आहे. १८५ शेतकऱ्यांना कडबाकुट्टी तर ३७० महिलांना पिठांच्या गिरणीसाठी अनुदान दिले जाणार आहे..अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून दररवर्षी स्वनिधीतून विविध योजनांचा लाभ देत साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले जाते. त्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन लाभार्थ्यांच्या याद्या मागितल्या जातात. यंदा समाजकल्याण विभागासाठी स्वनिधीतून २ कोटी ८४ लाखाचा निधीची तरतुद केली आहे. .या निधातून प्रामुख्याने निवड झालेल्या प्रत्येक कडबाकुट्टीसाठी निवड झालेल्या प्रत्येक शेतकऱयांना २७ हजार, पिठाची गिरणीसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना १३ हजार ५०० रुपये, मुलीं व मुलांसाठीच्या सायकलीला प्रत्येकी ६०५० रुपये, स्पिंकलरसंचासाठी ३० हजार ३६० रुपये व स्पे पंप साठी प्रत्येकी ९ हजार २०० रुपयांचा अनुदान दिले जाणार आहे..Ahilyanagar ZP :अण्णासाहेब शिंदे सभागृहावर बुलडोझर; झेडपीच्या वारशावर घाला.लाभार्थी निवडी पुर्ण झालेल्या असून अनुदान शेतकऱ्यांच्या खाती थेट जमा होईल असे सांगण्यात आले. या योजनांतून शेतकऱ्यांची मागणी अधिक असते. मात्र तरतुद कमी असल्याने अधिक शेतकऱयांना लाभ मिळत नाही अशी खंत लाभाच्या प्रतिक्षेत असेलेले शेतकरी व्यक्त करत आहेत..सप्टेंबर अखेरपर्यत लाभजिल्हा परिषदेच्या स्वनिधीतील समाजकल्याणसह सर्वच योजनेच्या लाभासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांच्या शिफारसीनुसार लाभार्थी निवडले जातात. गेल्या पाच वर्षापासून मात्र जिल्हा परिषदेत पदाधिकारी नसल्याने अधिकारी स्तरावर प्रथम येणाऱ्यास प्राधान याप्रमाणे लाभार्थी निवड केली जात आहे. .Ahilyanagar ZP : अहिल्यानगर ‘झेडपी’चे अध्यक्षपद ‘अकोले’कडे जाण्याची शक्यता.समाजकल्याणच्या योजनांसाठीच्या अनुदानाचा लाभ यंदा सप्टेंबर अखेर देण्याचे नियोजन केले आहे. एप्रिलमध्येच सर्वेक्षण करुन याद्या तयार करणे, मे मध्ये याद्याची फेरतपासणी, जूनमध्ये लाभार्थी याद्या निश्चित करणे, जुलैमध्ये योजनेच्या अमलबजावणीचे प्रस्ताव, आॅगस्टमध्ये सामुग्री खरेदी आणि या महिन्याच्या अखेर प्रत्यक्ष लाभ देण्याचे समाजकल्याणचे शेड्युल आहे..योजनानिहाय लाभार्थीकडबाकुट्टी १८५ (५० लाख)पिठाची गिरणी ३७० (५० लाख)मुलींसाठी सायकल ६६१ (४० लाख)मुलांसाठी सायकल ६११ (३७ लाख)स्पिंकलर १८१ (५५ लाख)स्पे पंप ५६५ (५२ लाख).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.