Fertilizers Demand: अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप पिकांना युरिया खताची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. मात्र, युरिया उपलब्ध होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले असून, कृषी सेवा केंद्रांवर गर्दी वाढली आहे. काही ठिकाणी युरियाची चढ्या दराने विक्री होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.