Livestock Losses: अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल होत असून पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दिवसभर कडक ऊन आणि त्यानंतर सायंकाळी ढगाळ वातावरण, वादळी वारे व मुसळधार पावसामुळे अनेक भागांना फटका बसला. सहा तालुक्यांमध्ये ४६ घरांची पडझड झाली असून, दोन तालुक्यांत नऊ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे..राहुरी, राहाता, नेवासा, पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. .Dharashiv Rain Damage: अवकाळीने ८५५ हेक्टर क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त.प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राहाता तालुक्यात १५, नेवासा १२, श्रीगोंदा १०, कर्जत ५, राहुरी २ आणि पारनेर तालुक्यात २ घरांचे नुकसान झाले आहे..Sawantwadi Rain Damage: सावंतवाडीला वादळाचा तडाखा.पारनेर तालुक्यात झाड कोसळल्याने पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर श्रीगोंदा तालुक्यात वीज पडून चार शेळ्या दगावल्या. याशिवाय पारनेर तालुक्यातील केळी पिकांना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे..नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी हिरवळ (ता. पारनेर) येथील शेतकरी मंगेश सालके यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.