Ahilyanagar Weather Update: अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड, पारनेर आणि संगमनेर तालुक्यातील काही भागांना शुक्रवारी झालेल्या वादळी पूर्वमोसमी पावसाचा फटका बसला. जामखेड तालुक्यातील बावी गाव व परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले. तसेच गोठ्यात वीजप्रवाह उतरल्याने तीन गाई दगावल्याची घटना घडली..जामखेड तालुक्यातील बावी आणि परिसरात जोरदार वादळी पूर्वमोसमी पाऊस झाला. येथील पवन जाधव यांच्या जनावरांच्या गोठ्यात वादळादरम्यान वीजप्रवाह उतरल्याने तीन गाईंचा मृत्यू झाला. या घटनेत पवन जाधव यांनाही विजेचा धक्का बसला..Raigad Unseasonal Rain: रायगड जिल्हा १२ तास अंधारात.वादळी वाऱ्यामुळे परिसरातील लिंबोणीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सचिन मुरूमकर, बयाजी पवार, दत्ता कारंडे, अभिमान पवार आणि मधुकर पवार यांच्या फळबागांना फटका बसल्याची माहिती मिळाली.पारनेर तालुक्यातील सुपा, भाळवणी, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, पोखरी, किन्ही, हंगा, बहिरोबाचीवाडी, करंदी, वडगाव गुंड, लोणी हवेली, सिद्धेश्वरवाडी, पुणेवाडी आणि कुंभारवाडी परिसरातही वादळी पावसाने हजेरी लावली. .Unseasonal Rain Damages: पूर्व मोसमी पावसाने साडेचारशे हेक्टरवरील पिके बाधित.संगमनेर तालुक्यातील साकुरलाही या पावसाचा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली असून कांदा व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक चित्र आहे. महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे..अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस यलो अलर्टहवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. शेतकऱ्यांनी फळबागांना आधार द्यावा, काढणीस आलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा तसेच पशुधन आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.