Rabi Season Onion Farming Update: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यंदाही शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. अंतिम आकडेवारीनुसार केवळ रब्बीत सुमारे एक लाख ८२ हजार ३४९ हेक्टरवर कांदा लागवड झाली असून, यंदा जिल्ह्यात कांदा लागवडीचे क्षेत्र सुमारे तीन लाख दहा हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे. .अलीकडच्या काही वर्षापासून पुरेसा दर मिळत नसल्याने आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे शेतकरी सातत्याने आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच त्यातच यंदा परतीचा पाऊस, तसेच अन्य वेळीही कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सातत्याने अडचणीत वाढ झाल्यानंतरही जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र मात्र वाढत आहे..Onion Farming: राबवतो उत्पादन सुधारणेची त्रिसूत्री.कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा वर्षभरात तीन लाख हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. खरिपात कांदा लागवड क्षेत्र कमी होते. मात्र लेट खरीप आणि रब्बी मध्ये कांदा लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे..रब्बीचे जिल्ह्याचे कांदा लागवडीचे सरासरी क्षेत्र १ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बीत सुमारे १ लाख ८२ हजार ३४९ हेक्टरवर लागवड झाली आहे. खरिपात १९ हजार ८६३ तर लेट खरिपात ९७ हजार ८८४ हेक्टवर कांदा लागवड झाली होती. जिल्ह्यात यंदा वर्षभरात तीन लाखांपेक्षा अधिक असे विक्रमी कांदा लागवडीचे क्षेत्र असल्याचे कृषी विभागाकडून सागंण्यात आले..Onion Farming: दरात पडझड, तरी कांदा लागवडीकडेच कल.तालुकानिहाय लागवड (हेक्टरमध्ये)अहिल्यानगर : १०,४२४ (२६,९६०), पारनेर ः ३३,१३७ (५९,५३०), पाथर्डी ः १६,९३५ (२४,८५५), कर्जत ः १४,५७९ (३३,२१३), जामखेड ः ६,२२१ (१८,२६६), श्रीगोंदा ः १५,९७६ (३७,५७२), श्रीरामपूर ः १०,३८६ (१०,४९०), राहुरी ः ६,९५० (१०,४९२), नेवासा ः २०,३८९ (२५,९२३), शेवगाव ः १२,८७४ (१३,६२७), संगमनेर ः ११,६५६ (१५,०७६), कोपरगाव ः ९,७०४ (१०,३६८), अकोले ः ८,९५५ (८,९५५) राहाता ः ४,१६३ (४,७६९).दर कमी असूनही शेतकऱ्यांची पिकाला पसंती कायमगेल्या काही दिवसांपासून बाजारात कांद्याला सरासरी साडेसहाशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मिळणारा दर अत्यंत कमी असूनही अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा उत्पादनाला शेतकऱ्यांची पसंती कायम आहे. सोमवारी (ता. २३) एक नंबरच्या कांद्याला ९०० ते १२०० रुपये, दोन नंबरला ६०० ते ९००, तीन नंबरला ३०० ते ६००, चार नंबर कांद्याला १५० ते ३०० व सरासरी ६५० रुपये दर मिळाला. गेल्या अनेक महिन्यापासून कांद्याचे दर स्थिर आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.