Livestock Care : अहिल्यानगर दुष्काळसदृश परिस्थितीत पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. चाऱ्याचे नियोजन करण्यासाठी जनावरांची संख्या, चाऱ्याची उपलब्धता, मुरघासाचा साठा आणि सिंचन सुविधेसह चारा उत्पादनासाठी उपलब्ध क्षेत्र याबाबत पशुसंवर्धन विभागामार्फत अहिल्यानगर जिल्ह्यातील पशुपालकांचे सर्वेक्षण सुरू केले असून आतापर्यंत ६४ हजारावर पशुपालकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे..या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील हिरवा व कोरडा चारा, मुरघास, पशुखाद्य आणि रब्बी हंगामात चारा उत्पादनासाठी उपलब्ध असलेल्या क्षेत्राची माहिती संकलित करून पशुधनाच्या भविष्यातील चारा गरजेचे नियोजन करण्याला मदत होणार आहे. राज्यात कमी अथवा खंडित पर्जन्यमान झाल्याने शेतीसह पशुधनाच्या चारा उपलब्धतेचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. त्यामुळे तालुकानिहाय टंचाई आढावा बैठका घेऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. पशुधनाला भविष्यात चाऱ्याची कमतरता भासू नये, उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन करता यावे आणि संभाव्य टंचाईवर वेळीच उपाययोजना करता याव्यात, यासाठी पशुपालकांचे सर्वेक्षण केले जात आहे..Sugarcane Care: कमी पावसातही उसाची वाढ टिकवण्यासाठी कोणत्या फवारण्या कराव्या?.या सर्वेक्षणात केवळ चारा उपलब्धतेची माहिती संकलित केली जात नसून, पशुधनाच्या नोंदींचीही पडताळणी केली जात आहे. जनावरांच्या कानातील बिल्ला क्रमांकांची भारत पशुधन प्रणाली अर्थात एन.डी.एल.एम.वरील नोंदींशी पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे पशुधनाची माहिती अद्ययावत करण्यास मदत होणार असून, हे सर्वेक्षण पशुधन गणनेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरणार आहे..Sugarcane Price Hike : ऊस उत्पादकांना प्रति टन ३०० वाढीव दर जाहीर करा.सर्वेक्षणाचे काम अधिक परिणामकारक आणि वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नोंदणीकृत कृत्रिम रेतन सेवादात्यांचीही विनामानधन तत्त्वावर मदत घेण्याचे आदेश दिले आहेत..आत्तापर्यंतचे तालुकानिहाय सर्व्हेक्षणअकोले : ४ हजार ७०१, जामखेड : १८९४, कर्जत : ४८७५, कोपरगाव : ५६१०, अहिल्यानगर : ६२६२, नेवासा : ३०६६, पारनेर : २३१९, पाथर्डी : ६१८८, राहाता : ३९२२, राहुरी : २९९३, शेवगाव : ८८६५, श्रीगोंदा : ४१६०, संगमनेर : ५८६२, श्रीरामपूर : ३६५४, एकूण : ६४,३७१.चारा उपलब्धतेची माहिती संकलितपशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक पशुपालकांच्या घरी जाऊन जनावरांची संख्या, जनावरांची वर्गवारी, उपलब्ध मुरघास, हिरवा व कोरडा चारा तसेच पशुखाद्याच्या उपलब्धतेची माहिती घेत आहेत. ज्या पशुपालकांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांच्याकडे रब्बी हंगामात चारा उत्पादनासाठी किती क्षेत्र उपलब्ध होऊ शकते, याचीही नोंद केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.