Ahilyanagar News: युद्धजन्य परिस्थितीचा गॅसटाक्या वितरणावर कोणताही परिणाम झाला नसून पुरेशा टाक्या उपलब्ध आहेत, अशी सारवासारव जिल्हा प्रशासनाने केली असली..तरी अहिल्यानगर जिल्ह्यात तुटवडा असल्याचे सांगत वितरकांकडून मात्र चढ्या दराने टाक्या विकल्या जात असल्याने शहरी व ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत..LPG Cylinder Booking: गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये बदल; डिलिव्हरीमधील अंतर २१ दिवस.शहरासह ग्रामीण भागात आता शेतकरी, कष्टकरी, कामगार घरगुती गॅसचा वापर करत आहेत. सध्या सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस टाक्या मिळणार नसल्याची चर्चा सुरु झाली आणि लोकांनी बुकींगसाठी घाई सुरु केली..LPG Gas Cylinder Price Hike: युद्धाची सर्वसामान्यांना झळ, घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागला.मात्र गेल्या चार दिवसापासून ऑनलाईन बुकींग होत नव्हते. त्यामुळे गॅसटाकी मिळणार नाही अशी लोकांत चर्चा सुरु झाली. बुकिंग का होत नव्हते याबाबत मुख्य वितरकांकडून कोणताही खुलासा केला नाही. .मात्र लोकांत चुकीचा संदेश जात असल्याने अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभाग, जिल्हा प्रशासनाकडून वितरकांची बैठक घेऊन गॅस वितरणाबाबतचा आढावा घेतला. युद्धजन्य परिस्थितीचा गॅसटाक्या वितरणावर कोणताही परिणाम झाला नाही, असे यावेळी सांगितले गेले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.