Farmer Income: अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा फळबाग लागवडीला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. यंदा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून सुमारे ३ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत लागवड झाली आहे. यंदा उद्दिष्टापेक्षा अधिक फळबाग लागवड झाल्याचे दिसत आहे..अहिल्यानगर जिल्ह्यात अलीकडच्या काही वर्षाचा विचार केला तर शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल आहे. पाच एकरपेक्षा आत (२ हेक्टर) क्षेत्र असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते. पाच एकरापेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या आणि ज्यांच्याकडे जाॅबकार्ड नसलेल्या शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर योजनेतून फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते. .Orchard Farming : नवीन फळझाडांची रोपे, कलमांची निवड.या योजनेसाठी उद्दिष्ट निश्चित नव्हते, मात्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीसाठी यंदा २ हजार ४०० हेक्टरचे उद्दिष्ट होते. मात्र फळबाग लागवडीला यंदा शेतकऱ्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. यंदा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून २ हजार ९९४ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. .Orchard Farming : सांगली जिल्ह्यात फळबागेचे क्षेत्र एक लाख एकर.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून यंता आतापर्यंत ५३३ हेक्टरवर लागवड झाली आहे. मार्च अखेरपर्यंत दोन्ही योजनेतून लागवडीचा आकडा वाढण्याचा अंदाज आहे. यंदा दोन्ही योजनेतून अहिल्यानगर, शेवगाव, अकोले तालुक्यात सर्वाधिक तर जामखेड, श्रीरामपुरला कमी क्षेत्रावर लागवड झाली..रोजगार हमीतून झालेली फळबाग लागवड कंसात फुंडकर योजनेतील क्षेत्र (हेक्टर) अहिल्यानगर ः २८० (४१), पारनेर ः २२६ (५१), पाथर्डी ः २३३ (१८), कर्जत ः २२२ (३३), श्रीगोंदा ः २१३ (७८), जामखेड ः १५० (८), श्रीरामपुर ः १५८ (१०), राहुरी ः १७० (७८), नेवासा ः २३६ (४३), शेवगाव ः ३०३ (४), संगमनेर ः २२० (६०), कोपरगाव ः १८७ (७), अकोले ः २८६ (८), राहाता ः १०४ (८९)..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.