Agri Scam Maharashtra : अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप हंगामात बनावट बियाणांबाबत आलेल्या तक्रारीपैकी ३१ तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने तपासणी केल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली. बनावट बियाणांच्या बहुतांश तक्रारी या सोयाबीन बियाणांच्या आहेत..जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सर्वाधिक कपाशी लागवड व सोयाबीनची पेरणी झाली आहे. एकीकडे ‘एल निनो’चा धोका, तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. त्यातच बनावट बियाणांची विक्री झाल्याच्या आणि त्यात सर्वाधिक सोयाबीन बियाणांच्या अधिक तक्रारी तालुकास्तरीय समितीकडे आल्या. त्यात सर्वाधिक कोपरगाव तालुक्यातील २०, अहिल्यानगर तालुक्यातील ९, श्रीरामपूरमधील २, अकोले व राहाता येथील प्रत्येकी एक अशा ३३ तक्रारीचा समावेश आहे..Soybean Seed Quality Issue: सोयाबीन बियाणे उगवणक्षमतेच्या बहुतांश तक्रारींमध्ये तथ्य.अहिल्यानगर तालुक्यातील सर्व तक्रारी पिंपळगाव माळवी गावातील आहेत. कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड, वेळापूर, वेसगाव, दहिगाव बोलका, भोजडे, डाऊच, चासनळी, मायगाव देवी, माहेगाव देशमुख या गावांचा समावेश आहे. तर श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव, माळवडगाव आणि अकोले तालुक्यातील अंभोळ गावाचा समावेश आहे..Soybean Seed Complaints: निकृष्ट बियाणे पुरविणाऱ्या ८५ कंपन्यांवर ‘एफआयआर’.तालुका तक्रार निवारण समितीमध्ये तालुक्याचे गुणनियंत्रक अधिकारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे किंवा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कंपनी प्रतिनिधी असतात. तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्यावर समिती प्लॉटची पाहणी केली. त्यानंतर समितीला ३१ तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित बियाणे कंपनीवर कारवाई केली जाणार आहे..शेतकऱ्यांना आवाहनशेतकऱ्यांनी बियाण्यांचे पक्के बिल घ्यावे व ते जपून ठेवावे. बियाण्याची बॅग फोडताना खालून फोडावी, जेणेकरून बॅगवरील टॅग सुस्थितीत राहील. बियाणे खरेदी करताना अधिकृत कृषी सेवा केंद्रचालकाकडूनच घ्यावे. कृषी निविष्ठांबाबत काही तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.