Drought Declaration : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या ३५ ते ४० दिवसांपासून पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिके करपून गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी एकरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, तसेच कृत्रिम पाऊस पाडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटना महिला आघाडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे..शेतकरी संघटनेचे स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, महिला आघाडीच्या सुनीता वानखडे, बाळासाहेब घोगरे, मधुकर काकड, प्रकाश जाधव, मयूर भनगडे, श्रीराम त्रिवेदी, शांताराम महंकाळे, नामदेव घोगरे, राजेंद्र शिंदे, बाबासाहेब गायकवाड, आशा महांकाळे, कोमल वानखडे, पुष्पा घोगरे, मंदा गमे आदींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची हानी झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याअभावी पिके जळून गेली आहेत. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे पंचनामे करून जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा आणि बाधित शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली..Rohit Pawar Demands Drought Declaration: शेतीसमोर संकट अधिक गडद? तत्काळ दुष्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, १० मुद्दे केले उपस्थित.सध्या खरीप पिके वाचविण्याची शक्यता कमी असली, तरी कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्यास जमिनीतील व भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यास मदत होऊ शकते. त्यातून रब्बी हंगामातील पिकांना काही प्रमाणात आधार मिळू शकतो. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी..Marathwada Drought: सोयाबीनसह खरीप पिके करपली, नेते शेतीच्या बांधावर, सरकार दुष्काळ कधी जाहीर करणार?.पावसाअभावी पिकांसोबत जिल्ह्यातील पशुधनासमोरही चाऱ्याचे संकट निर्माण झाले आहे. पशुपालकांना जनावरे जगविणे अवघड होत असल्याने शासनाने पशुधनासाठी चारा छावण्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित पाण्याची सोय आहे, ते ठिबक, विहीर किंवा अन्य स्रोतांच्या माध्यमातून खरीप पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागण्यांची तातडीने दखल घेऊन अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे..‘रात्रीचा वीजपुरवठा पूर्ववत करा’शेतकरी संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, महावितरणने १ सप्टेंबरपासून रात्रीच्या वीजपुरवठ्यात चार तासांची कपात केल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत वीजपुरवठ्यातील कपात म्हणजे शेतकऱ्यांच्या संकटात भर असल्याची टीका संघटनेने केली. महावितरणने रात्रीचा वीजपुरवठा पूर्ववत करून १० तासांचा करावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.