Ahilyanagar News : शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुसंस्कार व नवी दिशा देण्याचे काम शिक्षक करतात. विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी शिक्षकांनी ज्ञानदानातून सक्षम पिढी घडवावी. शिक्षण क्षेत्रात .जिल्हा राज्यात अव्वल राहण्यासाठी अधिक प्रयत्न व्हावेत, कारण शिक्षकांवर सामाजिक विकासाची जबाबदारी आहे, असे मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले..अहिल्यानगर येथे जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वितरण झाले. विधानसभेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठलराव लंघे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संध्या गायकवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते..श्री. विखे पाटील म्हणाले, ‘‘विविध आव्हाने समर्थपणे पेलून, शिक्षण परिघाच्या पलीकडे जाऊन शिक्षकांनी प्रयोगशीलतेतून ज्ञानदान केले व त्यामुळे जिल्ह्याचा नावलौकिक राज्यभर वाढवला. ही बाब जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. शिक्षक हा राष्ट्र व समाजाच्या उत्कर्षाच्या प्रक्रियेतील प्रमुख घटक आहे..ZP Teachers Award : जिल्हा परिषदेचे तीन वर्षांचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.शाळांतून दिलेल्या ज्ञानदानातूनच राष्ट्र व समाजाच्या भवितव्याची दिशा तरुण पिढी ठरवणार आहे. ज्ञानाचा कक्षा रुंदावताना शिक्षक विद्यार्थ्यांसाठी शिडी धरतात व विद्यार्थी उद्याची वाटचाल करतात. शिक्षकांशिवाय राष्ट्राची व समाजाची प्रगती अशक्य असल्याने ज्ञानाची साधना अखंडपणे सुरू ठेवण्याची गरज आहे.’’.Agriculture GST Reform: ग्राहकांपर्यंत झिरपावी कर सवलत.प्रास्ताविकात भंडारी यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कामाची माहिती दिली. मिशन आपुलकी, मिशन आरंभ आदींविषयी त्यांनी माहिती दिली..तीन वर्षांच्या पुरस्कारांचे वितरणजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात येणारे जिल्हा शिक्षक पुरस्कायर रखडले होते. यावर्षी झालेल्या कार्यक्रमात २०२२, २३ व २४ या वर्षांतील जिल्हा शिक्षक, केंद्रप्रमुख पुरस्कार वितरण झाले. यात एकूण ४८ शिक्षक, केंद्रप्रमुखांना गौरवण्यात आले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.