District Bank Polls : अहिल्यानगर गेल्या चार महिन्यांपासून प्रशासक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी मंगळवारी (ता. १८) निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. या यादीवर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी १५ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. दरम्यान, यंदा निवडणुकीसाठी बँकेचे ३ हजार ६७७ मतदार आहेत. त्यात ३६६ संस्थांचे ठराव अपात्र ठरले असून, २३३ संस्थांनी ठराव सादर केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे..अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकांची मुदत २० फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. मात्र, मे महिन्यात बँकेवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. त्यानंतर जून महिन्यात विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था (शेतीपूरक मतदारसंघ) आणि बिगरशेती संस्था मतदारसंघातील संस्थांकडून १६ जून ते १६ जुलैपर्यंत ठराव मागविण्यात आले होते..Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक २३ ऑगस्टला.त्यानुसार जिल्हा बँकेने निवडणूक अधिकाऱ्यांकडे ५ हजार ८९० सभासदांची (मतदारांची) यादी पाठवली होती. यापैकी उपलब्ध ठरावांनुसार विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे १ हजार ३६७, बिगरशेती मतदारसंघातील १ हजार ५९५ आणि शेतीपूरक मतदारसंघातील १ हजार ५१, असे एकूण ४ हजार १३ संस्थांचे ठराव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले होते..Solapur Cader Election : सोलापूर ‘कॅडर’ निवडणुकीसाठी सभासदांची अंतिम यादी निश्चित.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या यंत्रणेने या ठरावांची तपासणी केली. त्यात ३६६ ठराव अपात्र ठरविण्यात आले. यामध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे ७, बिगरशेती मतदारसंघातील १२४, तर शेतीपूरक मतदारसंघातील २३५ ठरावांचा समावेश आहे. तसेच २३३ संस्थांनी ठराव सादर केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या २७, बिगरशेती मतदारसंघातील १५६ आणि शेतीपूरक मतदारसंघातील ५० संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीसाठी सेवा सोसायटी मतदारसंघ, बिगरशेती मतदारसंघ आणि शेतीपूरक मतदारसंघातून ३ हजार ६४७ आणि ३० व्यक्तीगत मतदार, असे एकूण ३ हजार ६७७ मतदार निश्चित झाले आहेत. त्यानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे..३१ ऑगस्टपर्यंत यादीवर हरकती, सूचनाप्रारूप मतदार यादी जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्यालयासह बँकेच्या तालुका विकास अधिकारी कार्यालयात, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात आणि तालुकास्तरावरील सहनिबंधक कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ३१ ऑगस्टपर्यंत यादीवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. या हरकती व सूचनांवर १० सप्टेंबर रोजी निर्णय देण्यात येणार आहे. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर लगेचच बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.