Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme: चौथ्या यादीतील ४ लाख ८७ हजार शेतकऱ्यांना खात्यात कर्जमुक्तीचे ४,७६५ कोटी जमा!
Farmer Relief: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या चौथ्या यादीतील प्रमाणीकरण झालेल्या चार लाख ८७ हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात बुधवारी (ता. ४) कर्जमुक्तीचे एकूण चार हजार ७६५ कोटी रुपये जमा करण्यात आले.