Pune News: ‘सकाळ अॅग्रोवन’ची तिसरी राज्यस्तरीय ‘एफपीओ महापरिषद’(एफपीओ लिडरशिप कॉन्क्लेव्ह) यंदा येत्या नोव्हेंबरमध्ये पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना आर्थिक व्यवस्थापन, बाजारपेठ विकास तसेच भांडवल उभारणीत सखोल मार्गदर्शन करण्याचे उद्दिष्ट या महापरिषदेचे आहे. .राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या विविध समस्यांमधून मार्ग काढत समूह शेतीची संकल्पना पुढे नेत आहेत. काही कंपन्यांनी उत्पादनापासून ते निर्यात व प्रक्रिया क्षेत्रात गरुडभरारी घेतली आहेत. परंतु, या कंपन्यांच्या समस्यांबाबत चर्चा घडवून वाटचालीसाठी योग्य दिशा देणारे व्यासपीठ राज्यात नव्हते. ती उणीव ‘सकाळ अॅग्रोवन’ने भरून काढली आहे. त्यातूनच शेतकरी उत्पादक संस्थांसाठी सप्टेंबर २०२२ मध्ये ‘अॅग्रोवन’ने पहिली राज्यस्तरीय नेतृत्व महापरिषद घेतली..FPO Ranking Maharashtra : ‘एफपीओं’साठी अनुकूल राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल.त्यानंतर ‘अॅग्रोवन’ची दुसरी ‘एफपीओ महापरिषद’ पुण्यात उत्साहात पार पडली. यामुळे समूह शेतीमधील संस्थांना आत्मविश्वास मिळाला व त्या कॉर्पोरट जगताच्या आणखी जवळ आल्या आहेत. आता तिसऱ्या महापरिषदेत भांडवल उभारणी, आर्थिक व्यवस्थापन, बाजारपेठ विकासावर होणार मंथन होईल. त्यामुळे राज्याच्या एफपीओ, एफपीसी चळवळीसाठी ही परिषद दिशादर्शक ठरेल..या महापरिषदेत राज्यातील निवडक २५० शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींचा सहभाग असेल. एफपीओंनी जगाच्या व देशाच्या शेतमाल तसेच प्रक्रियायुक्त बाजारपेठांकडे नेमके कसे पाहावे, संस्था बळकटीकरणासाठी नेमके काय करावे, भविष्यातील संधी व आव्हानांचा वेध कसा घ्यावा, याविषयी महापरिषदेत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. शेतकरी उत्पादक संस्था व कंपन्यांची चळवळ राज्यभर विस्तारते आहे;.FPO In Maharashtra : सर्व ‘एफपीओं’साठी ‘अमूल मॉडेल’ नको.परंतु, या चळवळीत भांडवल उभारणी हा पहिला अडथळा ठरतो आहे. त्यासाठी ही परिषद अचूक मार्गदर्शन करणार आहे. भांडवल उभारणीची समस्या सोडवत अनेक एफपीसी पुढे सरकल्या; मात्र त्यांना वित्त व्यवस्थापनाच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या विपणनच्या चक्रव्यूहात अडकल्या आहेत. या समस्यांवर ‘अॅग्रोवन’ची ‘एफपीओ महापरिषद’ या मंथन घडवून आणते आहे. तसेच, या समस्यांवरील प्रभावी उपायाचा मंत्रदेखील देणार आहे..महापरिषदेत सहभागी होण्यासाठी…महापरिषदेत फक्त निवडक एफपीओंचा समावेश केला जाणार आहे. त्यासाठी निकष ठरविण्यात आलेले आहेत. त्यामुळे परिषदेत सहभागी होण्यासाठी आतापासूनच नोंदणी करावी लागेल. नोंदणीची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर २०२५ आहे. त्याकरिता https://forms.gle/5gEdAiW9hsHvHES97 या लिंकवर किंवा सोबत जोडलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करावे व माहिती भरावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.