Ahilyanagar News : शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देऊन त्यांना सरकारी योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देणाऱ्या ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेला अहिल्यानगर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात एकूण १३ लाख ३५ हजार १२ शेतकऱ्यांपैकी ७ लाख २० हजार १७१ शेतकऱ्यांनी (५२.४५ टक्के) योजनेत ओळखपत्रासाठी नोंदणी केली आहे. .यात शेवगाव तालुका आघाडीवर असून आतापर्यंत सर्वाधिक ४९,८५७ (७५.८८ टक्के) शेतकऱ्यांची नोंदणी करून घेतली आहे. अहिल्यानगर तालुका मात्र यात मागे आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्येही ही मोहीम जोमाने सुरू असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. .Farmer ID : नवा खातेउतारा जोडण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण.कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर वाढवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ पासून महाराष्ट्रासह देशातील २४ राज्यांमध्ये ‘अॅग्रीस्टॅक’ योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांची आधार क्रमांकाशी संलग्न माहिती एकत्रित करून त्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक प्रदान करणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा त्वरित लाभ मिळवून देणे हा आहे..‘अॅग्रीस्टॅक’ योजनेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या डिजिटल ओळखपत्रामुळे अनेक फायदे होणार आहेत. यात पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा लाभ अधिक जलद व सुलभ होईल, शेतकऱ्यांसाठी कर्ज प्रक्रिया वेगवान होईल आणि त्यांना शेतीविकासासाठी अधिक साहाय्य मिळेल. यासोबतच, शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक सुलभ प्रवेश मिळेल, सरकारी कार्यालयांना वारंवार भेटी न देता डिजिटल सेवांचा लाभ घेता येईल, आणि शेतकऱ्यांना नव्या योजनांची माहिती तत्काळ मिळणार आहे..Farmer ID: फार्मर आयडीच्या गोंधळाचा शेतकऱ्यांना फटका.महसूल विभागाची मोहीम‘अॅग्रीस्टॅक’ ओळखपत्रासाठी शेतकऱ्यांना सीएससी केंद्र, तलाठी, कृषी सहायक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यामार्फत https://mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येते. ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया अवघड वाटते, त्यांच्यासाठी गावपातळीवर महसूल विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांचा आधारकार्ड क्रमांक त्यांच्या सातबारा उताऱ्याबरोबर जोडण्यात येऊन त्यांची ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेत मोफत नोंदणी करण्यात येत आहे..अॅग्रीस्टॅक नोंदणी करणारे शेतकरी (कंसात टक्केवारी)शेवगाव ः ४९,८५७ (७५.८८)कोपरगाव ः ३९,१९१ (६५.४६),श्रीरामपूर ः २९,३८० (६३.६०),नेवासा ः ७२,६४८ (५९.६९)राहुरी ः ४९,३३३ (५६.८०)कर्जत ः ५०,७३० (५५.६६),राहाता ः ३६,२६२ (५४.६६),जामखेड ः ४१,५४८ (५०.४९),अकोले ः ४३,१३९ (४९.१७),संगमनेर ः ७५,१६५ (४९.२९),पाथर्डी ः ५५,०४७ (४८.७०),पारनेर ः ६७,४५१ (५३.१९),अहिल्यानगर ः ४६,४३५ (३९.०७)श्रीगोंदा ः ६३,९८५ (५५.१५).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.