Agriculture Solar Pump Subsidy Maharashtra: मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी राज्य सरकारच्या हिस्स्यापोटी ७९३.७९ कोटी रुपये इतका निधी महावितरण कंपनीस वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मंजूर अंर्थसंकल्पीय तरतुदीमधून ही निधी दिला जात आहे. याबाबतचा शासन निर्णय ऊर्जा विभागाने जारी केला आहे. .सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत महावितरण कंपनीने सर्व वर्गवारीतील लाभार्थ्यांसाठी आस्थापित केलेल्या सौर कृषी पंपासाठी हा निधी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, मुंबई यांना यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे..Solar Pump Scheme: सौर कृषी पंप घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातोय का?; मुख्यमंत्र्यांकडून मोठा खुलासा.शेतकऱ्यांना दिवसा, विश्वासार्ह व अखंडीत वीज पुरवठा करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. त्यासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंपांचे वितरण' ५ वर्षाच्या कालावधीत ५ लाख पंप महावितरण कंपनीद्वारे आस्थापित करणे तसेच कृषी वितरण प्रणालीचे बळकटीकरण आणि क्षमतेत वाढ करणे व कृषी वितरण प्रणालीचे सौर ऊर्जीकरण केले जात आहे. सदर योजनेसाठी एकूण रकमेच्या अंदाजे ६० टक्के रक्कम बाजार कर्ज स्वरूपात्त एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बैंक (AMB) द्वारे प्रचलित बाजार दराने घेऊन महावितरण कंपनीला उपलब्ध करुन शासनाने मान्यता दिली आहे. .Solar Pump Scheme: सौर कृषी पंपाचे नुकसान झाल्यास किती वर्षे मोफत दुरुस्ती, नियम काय सांगतो?.या योजनेअंतर्गत ४,८१७.९७ कोटी इतका निधी २०२४-२८ या वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदीतून अनुदान स्वरुपात महावितरण कंपनीस दिला जात आहे. सन २०२५-२६ मध्ये महावितरण कंपनीने 'मागेल त्याला सौर कृषी पंप' या योजनेतंर्गत सर्व वर्गवारीतील लाभार्थ्यासाठी आस्थापित केलेल्या सौर कृषी पंपांसाठी सरकारच्या हिस्स्यापोटी १,६९४ कोटी इतका निधी महावितरण कंपनीस वितरीत केला होता. तसेच, आणखी एका शासन निर्णयाच्या माध्यमातून १,३६१ कोटी निधी महावितरण कंपनीस उपलब्ध करुन दिला होता. या योजनेंतर्गत सर्व वर्गवारीतील लाभार्थ्यांसाठी आस्थापित केलेल्या ३,१७,११२ सौर कृषी पंपांसाठी सरकारच्या हिस्स्याचा उर्वरीत ७९३.७९ कोटी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे..हा निधी केवळ या योजनेसाठीच सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी खर्च करण्यात येईल, याची खातरजमा करण्यात यावी. याबाबतचा त्रैमासिक अहवाल सादर करण्याची जबाबदारी संचालक (अर्थ), महावितरण यांची राहील, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. .‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्यात दररोज सुमारे १,५०० पंप बसवले जात आहेत. या योजनेमुळे सुमारे ४० लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी दिली होती. .मागेल त्याला सौर पंप योजनेविषयी....या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ३,५ आणि ७.५ अश्वशक्ती (HP) क्षमतेचे पंप देण्यात येतात. जर १० अश्वशक्ती क्षमतेचा पंप बसवला तर वरील अडीच अश्वशक्तीचा खर्च स्वतः शेतकऱ्याला करावा लागतो. यासाठी शेतकऱ्याला १० टक्के खर्च करावा लागत असून ९० टक्के अनुदान केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.