
Beed News : शेतकऱ्यांनी उत्पादन (Agriculture Production) घेण्याबरोबर स्वतःची विक्री व्यवस्था (Selling System) निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीस मदत होईल, असे प्रतिपादन कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) बीड यांच्या संयुक्त विद्यामानाने बीड येथे आयोजित केलेल्या कृषी महोत्सवात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत खरीदार-विक्रेता संमेलन आणि स्मार्ट प्रकल्पांतर्गत मोबिलायझेशन आणि सेन्सीटायझेशन ऑफ सीबीओ आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. के. जेजुरकर यांनी केले. श्री चव्हाण म्हणाले, की शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा उपयोग केल्यास मजुराचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, महिला बचत गट यांच्यामार्फत विविध प्रकारचे प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीस मदत होईल.
कृषी विभागामार्फत १०० टक्के ठिबक, तुषार, फळबाग यांत्रिकीकरण यासारख्या योजना राबविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल.
कृषी महोत्सवामधील विविध महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, यांत्रिकीकरण, निविष्ठा विक्रेते विविध स्टॉलला भेट देऊन त्यांच्या उत्पादनाची माहिती घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या पावर टिलरचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीमती शुभांगी तळेकर आणि अभिमान अवचार यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्फत राबवलेल्या उपक्रमाविषयी माहिती सांगितली.
या कृषी महोत्सवात विविध विषयावर चर्चासत्र आयोजन करण्यात आले आहेत. कृषी विज्ञान केंद्र खामगावच्या कार्यक्रम समन्वयक दीप्ती पाटगावकर यांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये म्हणून साजरा करण्यात येत असल्यामुळे तृणधान्याचे आहारातील महत्त्व आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.