Washim News : मागील चार महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मालेगाव तालुक्यातील अमानी परिसरातील अतिवृष्टीग्रस्त शेतपरिसराची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला..या पाहणीवेळी आमदार अमित झनक, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, महसूल उपजिल्हाधिकारी वीरेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, कृषी विकास अधिकारी अभिजित देवगीरकर, तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर, अतुल जावळे आदी उपस्थित होते..या वेळी श्री. भरणे म्हणाले, की अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नैसर्गिक संकटाला धैर्याने सामोरे जाताना शासन ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. जिल्ह्यात तब्बल २ लाख १० हजार शेतकऱ्यांचे सुमारे ४ लाख ३७ हजार ६१९ एकर पिकांचे नुकसान झाले आहे..शासन नियमाप्रमाणे १५१ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याशिवाय पशुधनाची हानी झाली असून अनेक घरांची पडझड झाली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. शासनाच्या वतीने प्रत्येक बाधित कुटुंबाला मदत दिली जाईल..Crop Damage Compensation : ऑगस्टमधील भरपाईसाठी १८९ कोटींची मागणी.ते म्हणाले, की म-जून महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. आता जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीबाबतची भरपाईदेखील लवकरच वितरित केली जाणार आहे..Flood Crop Damage : सीनेच्या पुरात आपत्ती व्यवस्थापन कुचकामी.शेतकऱ्यांनी समोर मांडलेल्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना दे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या काळात सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. .कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, असे सांगितले. ते म्हणाले, की महसूल, कृषी तसेच आपत्ती व्यवस्थापन निधीच्या माध्यमातून शक्य तितका दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याबरोबरच भविष्यात अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींच्या परिणामांना तोंड देण्यासाठी शाश्वत उपाययोजना करण्याचाही विचार सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.