Mumbai News: दर वर्षी आर्थिक तरतुदीच्या खर्चासाठी मार्च अखेरची वाट न पाहता वर्षभर निधी कसा खर्च होईल याकडे आम्ही पाहू, असे सरकारने कितीही सांगितले तरी पहिले पाढे पंचावन्न अशी अवस्था कृषी व फलोत्पादन विभागाची आहे. या वर्षीच्या आर्थिक वर्षात एकूण तरतुदीच्या केवळ ३४ टक्केच निधी १४ नोव्हेंबरअखेर खर्च करण्यात आला आहे. .राज्य सरकारच्या निधी वितरण विषयक संकेतस्थळावरील अधिकृत आकडेवारीनुसार कृषी विभागाचा ३२, तर फलोत्पादन विभागाचा ६९ टक्के निधी खर्च झाला आहे. यंदा राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तरतुदीच्या वितरणाला हात आखडता घेतला आहे..Agriculture Department: कृषी विभागातील अकार्यकारी पदे घोषित .यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी व फलोत्पादन विभागाच्या खर्चासाठी १२ हजार २३७ कोटी ६८ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर जुलै महिन्यात १८० कोटी ६४ लाख रुपयांची पुरवणी मागणी मंजूर आहे..अशी एकूण १२ हजार ४१८ कोटी ३२ लाख रुपयांची तरतूद आहे. यापैकी आतापर्यंत केवळ ५४८५ कोटी रुपयांचे वितरण झाले असून त्यातील ४२२४ कोटी २६ लाख रुपये खर्च झाले आहेत. ही टक्केवारी एकूण वितरणाच्या केवळ ३४ टक्के आहे..Agriculture Well Fund : आडुळ येथील वैयक्तिक विहीर, गोठ्याचा निधी रखडला.कृषी विभागाच्या एकूण अनिवार्य खर्चासाठी ९३७७ कोटी ६ लाख रुपयांची मूळ तरतूद आहे. तर ६ कोटी ४२ लाख रुपयांची पुरवणी मागणी मंजूर आहे. असा एकूण ९३८३ कोटींच्या निधीपैकी ५३६४ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यातील ४६८३ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. अनिवार्य खर्च आणि राज्य व केंद्र सरकारच्या योजनांवरील खर्चासाठीच्या तरतुदीच्या केवळ ४१ टक्के निधी खर्च करण्यात आला आहे..योजनानिहाय खर्चकेंद्र व राज्य पुरस्कृत योजना सर्वसाधारण गटासाठी ११,६६१ कोटी रुपयांपैकी ५२३१ कोटी रुपये वितरित झाले असून यापैकी ४०९९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ही आकडेवारी एकूण तरतुदीच्या ३५ टक्के आहेत. राज्याच्या योजनेतून आदिवासी विकास विभागाच्या निधीपैकी केवळ २१ टक्केच निधी खर्च करण्यात आला आहे..विद्यापीठांना ठेंगायंदाच्या आर्थिक वर्षांत कृषी विद्यापीठांसाठी केवळ ४१३ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनात विद्यापीठांच्या पुरवणी मागण्यांवर फुली मारण्यात आल्याने एक रुपयाही मंजूर झाला नव्हता. मंजूर ४१३ कोटींपैकी १८६ कोटी वितरित केले असून १२० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. विद्यापीठांसाठी राज्य सरकारने हात आखडता घेतला असून केवळ अनिवार्य खर्चासाठीच निधी मिळत आहे. याचा मोठा परिणाम संशोधनावर होत आहे..खर्चाचा तपशील (१४ नोव्हेंबर अखेर, बीडीएस प्रणालीनुसार)तरतूद वितरण खर्च टक्केवारीएकूण कार्यक्रम खर्च १२४१८.३२ ५४८५ ४२२४.२६ ३४अनिवार्य खर्च ९३८३.४७ ५३६४ ४६८३ ५०कृषी विद्यापीठ ४१३ १८६ १२० २९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.