Fertilizer Shop Inspection: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्ह्यात सुरू केलेल्या तपासणी मोहिमेत १९ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांमध्ये अनियमितता आढळून आली. सुनावणीनंतर १२ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले असून ५ परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली..खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बियाणे आणि इतर कृषी निविष्ठांचा वेळेत पुरवठा व्हावा, यासाठी जिल्हाभर तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान १९ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांमध्ये विविध प्रकारच्या अनियमितता आढळून आल्या..Agriculture Inputs Seller: बीडमध्ये ५२ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर निलंबनाची कारवाई.संबंधित केंद्रचालकांची परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर ८ खत विक्री केंद्र, २ बियाणे विक्री केंद्र आणि २ कीटकनाशक विक्री केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले. तसेच ४ खत विक्री परवाने आणि १ कीटकनाशक विक्री परवाना निलंबित करण्यात आला..कृषी विभागाने विक्रेत्यांना साठा फलक व किंमतसूची अद्ययावत ठेवणे, खत साठा आणि विक्री नोंदवही नियमित ठेवणे, विनापरवाना खत विक्री न करणे तसेच ई-पॉस मशीनद्वारे विक्री करणे बंधनकारक केले आहे. या सूचनांचे पालन न केल्यास खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याचे विभागाने स्पष्ट केले..Agriculture Input Linking: निविष्ठा विक्रेत्यांनी लिंकिंग करू नये, अन्यथा कठोर कारवाई : पालकमंत्री जयकुमार गोरे .जिल्ह्यात खरीप हंगामासाठी खत व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, खरेदीचे पक्के बिल घ्यावे तसेच बिलावरील लॉट क्रमांक आणि किंमत तपासून घ्यावी, असे आवाहन भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले..ठळक बाबीबाब संख्यातपासणीतील केंद्रे १९रद्द परवाने १२परवाने निलंबित ५खत विक्री परवाने रद्द ८बियाणे विक्री परवाने रद्द २कीटकनाशक विक्री परवाने रद्द २.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.