Agriculture Department: रब्बी हंगामात कमी पाऊस आणि सिंचनासाठी पाण्याची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता करडई, जवस आणि मसूर या पर्यायी पिकांची पेरणी कितपत शक्य व फायदेशीर ठरू शकते, असा प्रश्न कृषी विभागाने विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या बैठकीत (ता. २६) कृषी विद्यापीठाला विचारला. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे विविध अडचणी मांडताना या पिकांबाबत शास्त्रोक्त मार्गदर्शन करण्याची मागणी करण्यात आली..स्थानिक हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार या पिकांचे योग्य वाण, पेरणीची वेळ, अपेक्षित उत्पादन आणि आर्थिक व्यवहार्यता या बाबत कृषी विद्यापीठाने केलेले संशोधन कोणते आहे, याची विचारणा करण्यात आली. तसेच या पिकांच्या लागवडीसाठी विद्यापीठाच्या शिफारशी उपलब्ध असल्यास त्यानुसार मार्गदर्शन करण्याची विनंतीही करण्यात आली..Rabi Crop Management: ढगाळ हवामानात रब्बी पिकांची काळजी कशी घ्यावी?.छत्रपती संभाजीनगर आणि लातूर कृषी विभागांकडून शेतकऱ्यांकडून मिळालेला अभिप्राय आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी बैठकीत मांडण्यात आल्या. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे निर्माण होणारी संभाव्य प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन विविध प्रकारच्या जमिनींसाठी आपत्कालीन रब्बी पीक नियोजन कसे असावे, याबाबतही सल्ला मागण्यात आला. .Rabi Crop Management : रब्बी पिकांत संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन महत्त्वाचे.कमी पाण्यात येणारी पिके, त्यांचे सुधारित वाण, पेरणीची योग्य वेळ आणि आवश्यक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान यांसंदर्भात कृषी विद्यापीठाच्या शिफारशी जाणून घेण्यात आल्या. याशिवाय हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या मर्यादा आणि एक ते ५० गायींचे संगोपन करणाऱ्या पशुपालकांसाठी या तंत्रज्ञानाचे प्रारूप कसे असावे, या बाबतही मार्गदर्शन मागण्यात आले..मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबीच्या बागा आहेत. इतर जिल्ह्यांतही कमी-अधिक प्रमाणात मोसंबीची लागवड केली जाते. हवामान बदलामुळे या बागांमध्ये तीव्र फळगळ आणि डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी तसेच बागांचे आयुष्य वाढवून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शास्त्रीय उपाययोजनांची मागणी करण्यात आली..सिंचन, मल्चिंग, संजीवके, रोगप्रतिकारक व प्रतिकूल परिस्थिती सहन करणारे रूटस्टॉक आणि एकात्मिक रोग व्यवस्थापन यांबाबत तत्काळ व दीर्घकालीन शिफारशी देण्याची विनंती करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीत मोसंबीच्या बागा टिकवून ठेवण्यासाठी मोसंबी संशोधन केंद्राने उपाययोजनांचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी करण्यात आली. या प्रस्तावात आवश्यक साहित्य, त्याची किंमत, मजुरी आणि उपाययोजनांमुळे होणारे फायदे यांचा तपशील द्यावा, असेही सुचविण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.