New Staffing Structure: राज्य सरकारने मंजूर केलेला कृषी विभागाचा नवा आकृतिबंध रद्द करण्याच्या मागणीसाठी सहा संघटनांनी आंदोलन कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच, ४ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारादेखील दिला आहे. .महाराष्ट्र राज्य कृषिसेवा महासंघ, महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग दोन राजपत्रित अधिकारी कल्याणकारी संघटना, महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य उप कृषी अधिकारी संघटना व महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटना या आंदोलनात उतरल्या आहेत. कृषी विभागाचा आकृतिबंध अतांत्रिक असून तो रद्द करावा. तसेच, तज्ज्ञ समिती गठित करून शेतकरीकेंद्रित नवा आकृतिबंध तयार करावा, अशी मागणी या संघटनांनी कृषी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे..Agriculture Officers Issue: आकृतिबंध रद्द न केल्यास कामबंद आंदोलन करू; कृषी अधिकारी संघटनांचा सरकारला इशारा.नव्या आकृतिबंधामुळे शेतकरी तसेच तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या हिताला बाधा येते. कृषी सेवा महासंघाने आकृतिबंधास विरोध दर्शवून तो रद्द करण्याची मागणी केली. परंतु, त्याबाबत प्रशासनाने निर्णय कळवलेला नाही. लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे या आकृतिबंधाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे..Agriculture Department: आकृतिबंधामुळे कृषी विभागाला नवी संस्थात्मक रचना.त्यामुळे निवृत्त सनदी अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली नव्या आकृतिबंधासाठी समिती गठित करावी. त्यात आजी-माजी अधिकारी व संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा. या समितीत जुन्या समितीमधील सदस्यांचा समावेश करू नये, अशा मागण्या या पत्रात करण्यात आल्या आहेत..आंदोलनाचे टप्पे२४ ते २५ ऑगस्ट : काळी फित लावून निषेध व्यक्त करणे२७ ऑगस्ट : कृषी विभागाच्या कार्यालयीन समूह माध्यम गटांमधून बाहेर पडणे२८ ऑगस्ट : रात्री उशिरापर्यंत काम करणे३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर : लेखणी बंद आंदोलन तसेच सर्व बैठकांवर बहिष्कार२ ते ३ सप्टेंबर : सामूहिक रजेवर जाणे तसेच जिल्हा व आयुक्तालय स्तरावर ठिय्या आंदोलन४ सप्टेंबर : बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करणे२४ ते २५ ऑगस्ट : काळी फित लावून निषेध व्यक्त करणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.