Agriculture Administration Modernization Program: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील सहायक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील कृषी विभागातील क्षेत्रीय स्तरावरील सहायक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप देण्यात आले..मावळ तालुक्यात एकूण ४५ लॅपटॉप देण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या विविध योजनांचे ऑनलाइन कामकाज, अहवाल तयार करणे आणि माहिती भरण्यासाठी या लॅपटॉपचा मोठा उपयोग होणार आहे..Talathi Laptop Purchase: तलाठ्यांना मिळणार ९४ कोटींचे लॅपटॉप .त्यामुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे काम अधिक गतिमान होण्यास मदत होईल, असे सहायक कृषी अधिकारी संघटनेचे मावळ तालुका अध्यक्ष घनश्याम दरेकर यांनी सांगितले..Laptop Scheme: लॅपटॉप खरेदी प्रस्ताव दाबून ठेवला .कृषी यांत्रिकीकरण, महाकृषी ॲपवरील अहवाल, विकसित भारत योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, शेतीशाळा, पीक प्रकल्प अहवाल, पेरणी अहवाल, प्रधानमंत्री सुधारित पीकविमा योजना, नैसर्गिक आपत्ती तसेच अन्य योजनांचे ऑनलाइन कामकाज करण्यासाठी लॅपटॉपची आवश्यकता होती..तसेच कृषी सहायक अधिकारी संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी विकास गोसावी म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॅपटॉप देण्याचे आश्वासन दिले होते. आता लॅपटॉप मिळाले आहे. या बाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे कृषी अधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.