Rural Development Maharashtra: छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. ३०) शहरातील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम संशोधन केंद्राच्या सभागृहात पार पडली. या सभेच्या विषयसूचीत कृषी विभागाशी संबंधित कोणत्याही महत्त्वाच्या विषयाचा समावेश नसल्याने कृषीकडे दुर्लक्ष झाल्याची भावना सदस्यांमध्ये व्यक्त झाली..विषयसूचीत समाविष्ट करण्यात आलेल्या ३१ विषयांमध्ये बांधकाम, आरोग्य, समाजकल्याण, पशुसंवर्धन, वित्त आणि पंचायत विभागाशी संबंधित विषयांचा समावेश होता. जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, बांधकाम सभापती सचिन गरड, शिक्षण व आरोग्य सभापती अनिता मोठे, समाजकल्याण सभापती बालाजी सोनटक्के, मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी. एम., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके आदी उपस्थित होते..Solapur ZP Meeting: सोलापूर जिल्हा परिषदेची ८ मे रोजी ‘स्थायी’ची पहिली बैठक.सभेच्या प्रारंभी अध्यक्ष गलांडे यांनी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यामागील भूमिका आणि विषयसूचीबाबत सदस्यांना माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी फर्निचर व अन्य अनुषंगिक कामांसाठी १४ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्याचा पहिला विषय सभेसमोर ठेवण्यात आला. या विषयावर शिवसेना सदस्य राधाकिसन पठाडे यांनी इमारतीला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, मात्र फर्निचर व इतर कामांसाठी इतका मोठा खर्च करण्यास विरोध दर्शविला..या विषयावर सौ. गायकवाड, पंकज ठोंबरे, संजय निकम पाटील, कृष्णा गिधाने, देविदास पालोदकर, केतन काजे, मनोज पेरे यांच्यासह अनेक सदस्यांनी चर्चा केली.सभेची नोटीस नियमानुसार १५ दिवस अगोदर देणे अपेक्षित असताना अनेक सदस्यांना ती २५ जून रोजीच देण्यात आल्याचा मुद्दा कृष्णा गिधाने यांनी उपस्थित केला. विशेष विषयसूचीत कोणते विषय समाविष्ट करायचे, याबाबत सदस्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याची नाराजीही काही सदस्यांनी व्यक्त केली. याची दखल घेण्याचे आश्वासन अध्यक्ष गलांडे यांनी दिले..Maharashtra Agriculture Department: कृषी आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती .यावेळी पिशोर-भिलदरी रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सदस्यांच्या शिफारशीशिवाय कोणतेही काम किंवा प्रस्ताव मंजूर करू नयेत, अशी भूमिका काही सदस्यांनी मांडली. त्यास अध्यक्षांनीही सहमती दर्शविली. मोडकळीस आलेल्या शाळांच्या इमारती, ग्रामपंचायत कार्यालये, समाजमंदिरे, अंगणवाड्या, आरोग्य उपकेंद्रे व इतर धोकादायक इमारतींबाबतही सभेत चर्चा झाली.Agriculture Department.अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेंतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेऊन गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणी राधाकिसन पठाडे यांनी केली. लाभार्थी याद्यांमध्ये वारंवार त्याच व्यक्तींची नावे येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉकची कामे वर्षभरातच खराब होऊ नयेत, यासाठी कामांच्या गुणवत्तेवर भर देण्याच्या सूचना अध्यक्षांनी दिल्या. तसेच वैरण विकास कार्यक्रम आणि आयुष अभियानांतर्गत ३७ आयुष दवाखाने सुरू करण्याच्या प्रस्तावांवरही चर्चा झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.