Pune News : राज्यभरातील कृषी उद्योगात उत्तुंग भरारी घेतलेल्या उद्योजकांमध्ये भविष्यातील शेतीसह उद्योगातील नवीन संधी बाबत रंगलेली चर्चा आणि सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रताप पवार, पोपटराव पवार, डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे अशा मान्यवरांसोबतच वैचारिक देवाणघेवाण करण्याची मिळालेली संधी उपस्थित उद्योजकांना बळ देणारी ठरली. निमित्त होते, सकाळ अॅग्रोवनच्या वतीने सोमवारी (ता. २५) आयोजित केलेल्या ‘अॅग्रिकल्चर ब्रॅण्ड्स ऑफ महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुक प्रकाशन आणि २० उद्योजकांच्या सत्कार सोहळ्याचे... .कधी उद्योजकांनी बालपणी केलेल्या ‘उद्योगांचे’ किस्से तर कधी कविता यातून उपस्थित कृषी उद्योजकांनी घेतलेल्या भरारीचे कौतुक करण्यात आले. यावेळी अमोल पाटील, विवेक रोहकले, विनोद हांडे, डॉ. विश्वास सोंडकर, चंदन शहा अशा उद्योजकांनी आपले मनोगतही व्यक्त केले. त्यातून उद्योजकांनी एकमेकांशी आपली उत्पादने, संभाव्य संशोधन आणि आपल्या उद्योगाची वाटचाल या बाबत चर्चा केली. .Agriculture Brand of Maharashtra: आनंदी गावे, समाधानी शेतकरी निर्माण करू.कार्यक्रमावेळी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर हे सामाजिक कार्य व उद्योग क्षेत्रातून पद्मश्री पुरस्कारप्राप्त असणे, हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट ठरले. ग्रामीण उद्योजकता, ग्राम विकास आणि बदलती शेती याबाबत पोपटराव पवार यांच्यासोबत अनेक उद्योजकांची चर्चा चांगलीच रंगली होती. उद्योजकांशी चर्चा करतानाही प्रताप पवार हे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या तंत्राचे शेती आणि उद्योगातील महत्त्व समजावत होते. .Agricultural Allied business : शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रियेची जोड आवश्यक.कार्यक्रमाच्या प्रत्येक भाषणांच्या नोंदी घेण्यामध्ये अनेक उद्योजक मग्न होते. डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांनी उद्योजकांशी बोलताना मेळघाटातील शेतकऱ्यांची स्थिती, समस्या सांगून, त्यांच्या शेतीला बळ देण्यासाठी मेळघाटामध्ये येण्याचे आमंत्रण दिले. या प्रसंगाची आठवण म्हणून कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सामूहिक छायाचित्र टिपण्यात आले..तंत्रज्ञानातूनच शेतकऱ्यांचे कल्याण होईल : प्रताप पवारसकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रताप पवार यांनी, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हाच शेतीचा मुख्य आधार असल्याचे निक्षून सांगितले. ‘‘एआय आधारित शेतीचे बारामतीमधील प्रयोग साडेतीन लाख शेतकऱ्यांनी पाहिले आहेत. .या तंत्रामुळे खते, किटकनाशके, पाण्याची मोठी बचत होते. इतर राज्येदेखील या तंत्रासाठी पुढे येत आहेत. मात्र, आपल्या राज्यात एआयसाठी ५०० कोटी रुपये दिल्याची घोषणा झाली; दुर्दैवाने पाच रुपयेदेखील अद्याप मिळालेले नाहीत. मात्र, कृषी उद्योजकांनीही या तंत्राचा प्रसार करावा. कारण, केवळ तंत्रज्ञानातूनच स्वतःचे आणि शेतकऱ्यांचे कल्याण होईल,’’ असे ते म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.