Government Project Issue: जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटूनही मराठवाड्याच्या राजधानीत कृषी भवन उभारणीला अजून मुहूर्त लागलेला नाही. गरज ओळखून मंजुरी मिळते, शासन निर्णय निघतो; मात्र त्यानंतरची प्रक्रिया गतीने का होत नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे..माहितीनुसार, प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता व गतिमानता यावी, या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथे एकत्रित कृषी भवन उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. या भवनामध्ये मंडळ कृषी अधिकारी ते विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयापर्यंतची सर्व कार्यालये तसेच आवश्यक प्रयोगशाळांचा समावेश असणार आहे. तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात ही मंजुरी देण्यात आली होती. जुलै २०२४ मध्ये यासंदर्भातील शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला..Agriculture Workshop: संभाजीनगरला शेतकऱ्यांसाठी मोफत कार्यशाळा.त्या निर्णयानुसार सुमारे ७४ कोटी १८ लाख १० हजार रुपये खर्चून शहानूर मियाँ दर्गा लगतच्या कृषी विभागाच्या जागेत कृषी भवन उभारण्याचे ठरविण्यात आले. मात्र, दोन वर्षे उलटूनही निधीअभावी या कामाला गती मिळालेली नाही. श्री. मुंडे यांच्यानंतरचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे तसेच विद्यमान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असला, तरी निधीअभावी त्याला अपेक्षित परिणाम मिळत नसल्याचे चित्र आहे..अलीकडेच संपलेल्या विधिमंडळ अधिवेशनात काही हालचाली होऊन यासाठीचा निधीचा ‘हेड’ तयार करण्यात आला. मात्र प्रत्यक्ष निधी उपलब्ध झालेला नाही. परिणामी, भविष्यातील गरज लक्षात घेऊन उभारण्यात येणारे कृषी भवन अद्याप कागदोपत्रीच आहे. विविध कामांसाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. एकाच छताखाली सर्व कार्यालयांची सुविधा कधी उपलब्ध होणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत..सध्या कार्यालयांची दयनीय अवस्थासध्या छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय चेतक घोडा चौकाजवळील इमारतीत भाडेतत्त्वावर सुरू आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयही भाड्याच्या जागेत कार्यरत आहे..Agriculture: फुलंब्री तालुक्यात कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट प्रलंबित असून ती इमारत धोकादायक स्थितीत आहे. उपविभागीय कृषी अधिकारी व आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयेही त्याच परिसरात असून, त्या ठिकाणी कामकाज सुरू ठेवण्यासाठी तडजोड करावी लागत असल्याचे चित्र आहे..प्रस्तावित कृषी भवनातील कार्यालयेमंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी (छत्रपती संभाजीनगर), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक, प्रकल्प संचालक (आत्मा), माती, खत व कीटकनाशक तपासणी प्रयोगशाळा, जैविक औषध निर्मिती प्रयोगशाळा तसेच तीन कॉन्फरन्स हॉल..छत्रपती संभाजीनगर येथे कृषी विभागाची विविध कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कामांसाठी वारंवार फिरावे लागते. यात वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत.- बाबासाहेब पडूळ, उद्यानपंडित.शासन निर्णयानंतर निधी तत्काळ उपलब्ध करून द्यायला हवा. अन्यथा कृषी भवन उभारणी लांबल्यास खर्चही वाढेल. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी काम वेळेत पूर्ण व्हावे.- सिकंदर जाधव, कृषीभूषण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.