Shivraj Singh Chouhan Interacting With Farmers: शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळावा यासाठी तूर, मसूर आणि उडीद यांसह सर्व कडधान्यांची किमान आधारभूत किमतीत (MSP) १०० टक्के खरेदीची खात्री देण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे, असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सरकारकडून विशेष आमंत्रित केलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली..चौहान यांनी म्हटले की, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशातील सुमारे ७० टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे शेती आणि त्यांच्याशी संलग्न व्यवसायांवर अवलंबून आहे. भारताने नुकतेच चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक तांदूळ उत्पादक देश म्हणून जगात आघाडी मिळवली. तसेच तांदूळ निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात आले असून, यामुळे विशेषतः बासमती उत्पादक शेतकऱ्यांच्या तांदळाला चांगला चांगले दर मिळत असल्याचा दावा त्यांनी केला..देशांतर्गत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकारने कडधान्यांच्या आयातीवर ३० टक्के आयात शुल्कही लागू केले असल्याचे मंत्री चौहान यांनी सांगितले..पंतप्रधान पीक विमा योजना अधिक बळकट केली जात आहे. जंगली प्राण्यांमुळे तसेच शेतात पाणी साचून राहिल्याने होणाऱ्या पीक नुकसानीला विमा संरक्षण देण्याचा विचार सरकार करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच निर्धारित कालावधीनंतर विमा दाव्यांची रक्कम देण्यास उशीर झाल्यास विमा कंपन्यांना १२ टक्के व्याज द्यावे लागेल, असेही त्यांनी सांगितले..AI In Agriculture : स्मार्ट शेतीसाठी २ हजार ५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार; एप्रिल २०२६ पासून प्रकल्प सुरु होणार.डिजिटल सुधारणांवर भर देताना चौहान म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्ज, विमा आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी फार्मर आयडी (Farmer ID) हे शेतकऱ्यांचे एक स्वतंत्र ओळखपत्र म्हणून सादर करण्यात आले आहे. उपग्रहाच्या आधारे पीक मूल्यांकनाच्या माध्यमातून कागदपत्रांची प्रक्रिया आणि होणारा विलंब कमी करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बनावट बियाणे, खते आणि कीडनाशकांवर कडक कारवाई करण्यात येई. तर गंभीर उल्लंघन केलेल्या प्रकरणांत तुरुंगवासासह दंडाची रक्कम वाढवून ३० लाख रुपयांपर्यंत करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. .Agricultural Credit: शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ येऊ नये, मुख्यमंत्री नायडू यांच्या बँकांना सूचना.'विकसित कृषी संकल्प अभियाना'च्या माध्यमातून शेतीतील वैज्ञानिक संशोधनाला गती देण्यात आली आहे. आयसीएआरची पथके पिकांवरील रोग प्रादुर्भावाची माहिती, काढणीपश्चात होणारे नुकसान आणि नाशवंत शेतमालाचा टिकाऊ कालावधी वाढवण्यासाठी काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.