Farming Tips for Farmers:वांगी, मिरची, टोमॅटोरब्बी हंगामात पिकाच्या कालावधीत पुरेशी सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या क्षेत्रात मिरची, वांगी व टोमॅटो पिकांची रोपवाटिका तयार करावी.वांगी, मिरची व टोमॅटो पिकांची रोपवाटिका तयार करण्यासाठी ३ मीटर लांब, १ मीटर रुंद आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. .रोपनिर्मितीसाठी रोगप्रतिकारक जातींच्या बियाण्यांचा वापर करावा.गादीवाफे तयार करताना चांगले कुजलेले शेणखत प्रति गुंठा ५०० किलो प्रमाणे जमिनीत मिसळावे. शेणखत जमिनीत मिसळण्यापूर्वी त्यामध्ये ट्रायकोडर्मा चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. जेणेकरून जमिनीतून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.पेरणीच्या वेळी प्रति चौ. मीटर क्षेत्रासाठी युरिया ३५ ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट १०० ग्रॅम आणि म्युरेट ऑफ पोटॅश २५ ग्रॅम द्यावे..Crop Advisory: कृषी सल्ला : मराठवाडा विभाग .बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्माद्वारे बीजप्रक्रिया करताना थोडेसे पाणी वापरून बियाण्यांवर त्याचा पातळ व एकसमान थर बसेल, याची काळजी घ्यावी.उगवण झाल्यानंतर १० ते १५ दिवसांनी भाताच्या पेंढ्याचे किंवा इतर पीक अवशेषांचे सेंद्रिय आच्छादन करावे. जेणेकरून जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.पारंपरिक सिंचन पद्धती ऐवजी सूक्ष्म सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा प्राधान्याने वापर करावा..कलिंगडपुरेशी सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या क्षेत्रात कलिंगड पिकाच्या जमिनीची पूर्वमशागत करून पेरणीसाठी आवश्यक तयारी करावी. लागवड सरी पद्धतीने २ बाय ०.५० मी. अंतरावर करावी.कलिंगड लागवड काळ्या रंगाचे प्लास्टिक (२० ते ३० मायक्रॉन) आच्छादन वापरून करणार असल्यास, नांगरट करून जमीन समपातळीत आणावी. यानंतर ५ ते ७ सेंमी उंच व ६० सेंमी रुंदीचे गादीवाफे आच्छादनासाठी तयार करावेत. दोन गादीवाफ्यांमधील अंतर २ मीटर ठेवावे..Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग.ठिबक सिंचन वापरावयाचे असल्यास आच्छादन अंथरण्यापूर्वी ठिबक सिंचनाचा संच वाफ्यावर पसरून घ्यावा. प्लास्टिक आच्छादन गादीवाफ्यावर अंथरावे व कडांवर मातीचा थर द्यावा. आच्छादनावर दोन ओळींमधील अंतर ४५ सें.मी. ठेवून ३ सें.मी. व्यासाची छिद्रे रुंदीच्या दिशेने पाडावीत. त्यानंतर लांबीच्या दिशेने ५० सें.मी. अंतरावर सरळ रेषेत ३ सेंमी व्यासाची छिद्रे पाडावीत. आच्छादनावर पाडलेल्या भोकात २ ते ३ सेंमी खोलीवर बियाण्याची पेरणी करावी..पेरणी वेळेस चांगले कुजलेले शेणखत १.५ किलो, युरिया ११ ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट ३२ ग्रॅम आणि म्युरेट ऑफ पोटॅश १० ग्रॅम प्रति आळे प्रमाणे खताची मात्रा द्यावी. तसेच संकरित कलिंगडाला पेरणीच्या वेळेस २ किलो चांगले कुजलेले शेणखत, २० ग्रॅम युरिया, ३२ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि १७ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति आळ्यास खतमात्रा द्यावी. खतांचा थेट बियाण्यांशी संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी. ट्रायकोडर्मा २ ग्रॅम प्रति आळे प्रमाणे शेणखतामध्ये मिसळून द्यावे. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे..खत व्यवस्थापनठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन करावयाचे असल्यास ९० दिवसांच्या पिकांच्या कालावधीकरिता एकूण नऊ हप्त्यामध्ये खत व्यवस्थापन करावे. पेरणीनंतर १५ दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे खते देण्यास सुरुवात करावी..पीक अवस्था एकूण हफ्ते प्रति एकर प्रति हप्ता खतमात्रा-- -- १९:१९:१९ युरिया ०:०:५०सुरुवातीचा कालावधी ३ १२ किलो १९ किलो ४ किलोवाढीची अवस्था ३ १२ किलो १९ किलो ४ किलोफळधारणा ३ १२ किलो १९ किलो ५ किलो- डॉ. वैभव राजेमहाडीक,९४२०६७३२६७- डॉ. यशपाल चव्हाण, ८१४९४६७४०१(कृषिविद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.