Agricultural Innovation : अहिल्यानगर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान आहे. विद्यापीठातील शिक्षकवर्गाच्या संशोधन कार्याची अद्ययावत व प्रमाणित माहिती नेटवर्क प्रणाली-विद्वानद्वारे एकत्रित झाल्यामुळे विद्यापीठाची संशोधन क्षमता, शैक्षणिक कामगिरी आणि राष्ट्रीय स्तरावरील दृश्यमानता अधिक प्रभावीपणे अधोरेखित होण्यास मदत होईल. .महात्मा फुले कृषी विद्यापीठाची संशोधनात राष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक बळकट होईल, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केले..Agriculture Skill Development: कुशल मनुष्यबळासाठी कौशल्य विकास; महात्मा फुले कृषी विद्यापीठ ‘एसआयआयएलसी’मध्ये सामंजस्य करार.महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारतीय संशोधन माहिती नेटवर्क प्रणाली-विद्वान संदर्भात कार्यशाळा झाली. कुलगुरू डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे उपस्थित होते..Agriculture College: शैक्षणिक संस्थांच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचे योगदान.डाॅ. खर्चे म्हणाले, की कार्यशाळेदरम्यान विद्वान ओळख नोंदणी, शिक्षकांच्या संशोधन कार्याची प्रोफाईल निर्मिती, संशोधन कार्याचे अद्ययावतीकरण, माहिती पडताळणी या बाबत प्रत्यक्ष हँड्स-ऑन प्रशिक्षण देण्यात आले. तसेच शिक्षकांच्या संशोधनविषयक माहितीचे अचूक संकलन, अद्ययावतीकरण आणि संस्थेच्या संशोधन माहिती व्यवस्थापन प्रणालीशी एकत्रीकरण याबाबत प्रात्यक्षिके घेण्यात आली. या प्रक्रियेमुळे विद्यापीठातील संशोधनविषयक माहिती अधिक शिस्तबद्ध, अद्ययावत आणि सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे..एन.आय.आर.एफ. मानांकनासाठी आवश्यक संशोधनविषयक माहितीचे अचूक संकलन व सादरीकरणाच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या कार्यशाळेत डॉ. खरबडे आणि डॉ. बोडके यांनी मार्गदर्शन केले. डॉ. विवेक चिमोटे, डॉ. अधीर आहेर, डॉ. नारायण मसमाडे, डॉ. अवधूत वाळुंज, डॉ. उदय दळवी आणि डॉ. अविनाश कर्जुले यांनी सक्रिय सहभाग घेत विविध तांत्रिक बाबींविषयी मार्गदर्शन केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.