Chandrapur News: ब्रह्मपुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी उपसण्यासाठी लावले जाणारे मोटारपंप चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत ब्रह्मपुरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल चार मोटारपंप जप्त केले आहेत. सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे..सोनगाव परिसरातील शेतकरी सोमेश्वर श्रीराम दरोरा यांनी २ फेब्रुवारी रोजी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नदीघाटावर पाणी उपसा करण्यासाठी बसवलेला तीन एच.पी. क्षमतेचा मोटारपंप चोरट्यांनी नटबोल्ट काढून लंपास केल्याचे त्यांनी सांगितले होते. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला गती दिली..Agriculture Pump Cable Theft : भराडी बंधाऱ्यानजीक कृषिपंपाच्या विद्युत केबलची चोरी.गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता सोनगाव शिवारात आरोपी अनिल मैंद आणि राजू चावने हे शेतात लपवून ठेवलेले मोटारपंप विक्रीच्या तयारीत असल्याचे आढळून आले. .Agriculture Pump Cable Theft : भराडी बंधाऱ्यानजीक कृषिपंपाच्या विद्युत केबलची चोरी.पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी सोनगाव व बेटाळा परिसरातील नदीघाटांवरून आणखी मोटारपंप चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या सांगण्यावरून एकूण चार मोटारपंप हस्तगत करण्यात आले..ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक प्रमोद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने ही यशस्वी कारवाई केली. नदीकाठावरील शेतात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.