Pune News : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी कृषी समृद्धी योजनेतून हजारो कोटी रुपयांचा निधी गाव पातळीपर्यंत पोहोचणार आहे. मात्र, योजनेतून योग्य कामे झाली की नाहीत, याचे मूल्यमापन करावे. तसेच, मूल्यमापन करणारी यंत्रणा त्रयस्थ असावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत..कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले की, एरवी राज्य किंवा केंद्राचा निधी विविध योजनांसाठी आल्यानंतर मूल्यमापन केले जात नाही. मात्र, कृषी समृद्धी योजनेतील निधीचे दरवर्षी मूल्यमापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे मूल्यमापन करणारी यंत्रणा कृषी विभागाची नको, अशी देखील अट टाकण्यात आली आहे. .Krushi Samrudhhi Yojana : निधीविना समृद्धी कैसी?.योजनेतील एकूण तरतुदीपैकी ०.१ टक्का निधी केवळ मूल्यमापनासाठी राखीव ठेवावा, कामांचे संनियंत्रण व मूल्यमापन गुणवत्तापूर्ण होण्यासाठी स्वतंत्र त्रयस्थ यंत्रणा नेमावी, संनियंत्रणासाठी संशोधन व शास्त्रोक्त सांख्यिकीचा आधार घ्यावा तसेच मूल्यमापनातून निघालेले निष्कर्ष थेट राज्य स्तरीय समितीला सादर करावेत, अशा सूचना शासनाने केल्या आहेत..कृषी समृद्धी योजनेला दरवर्षी पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षांत एकूण २५ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. या निधीतून सूक्ष्म सिंचन, अवजारे बॅंका, मूल्य साखळी विकास, जैविक शेती, साठवणूक, अन्न प्रक्रिया, नैसर्गिक शेती अशा विविध घटकांसाठी अनुदान वाटले जाणार आहे. योजनेतील कामांचे मूल्यमापन करण्यासाठी नेमकी कोणती यंत्रणा असावी, मूल्यमापनाची कार्यपद्धती कशी असेल, या बाबत अद्याप एकमत झालेले नाही. .Krushi Samrudhhi Yojana : कृषी समृद्धी योजनेतून जिल्ह्याला मिळणार १६ कोटी.परंतु, अनुदानामुळे कोणत्या पिकांची उत्पादकता कशी वाढली, शेतकऱ्यांच्या जीवनात कशी समृद्धी आली, तसेच या निधीमुळे सामाजिक व पर्यावरणीय क्षेत्रात नेमके कोणते सकारात्मक बदल घडले, याचा शोध घेण्याचे काम मूल्यमापन यंत्रणेवर सोपवले जाण्याची चर्चा आहे. योजनेच्या फलनिष्पत्तीचा वार्षिक अहवालदेखील तयार केला जाणार आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली..ग्रामविकास समित्यांचेही मूल्यमापनकृषी समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचा प्रस्ताव प्रथम गाव पातळीवरील ग्राम कृषी विकास समित्यांकडे जाणार आहे. अर्ज मागविणे, छाननी, निवड करणे असे अधिकार या समित्यांना देण्यात आले आहेत. मात्र, या समित्यांच्याही कामाचे सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑडिट) करावे, अशा सूचना शासनाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.