Agricultural Cooperative Society Annual Meeting: ॲग्रिकल्चरल कॉलेज फार्म को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची १११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. १३) कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर येथील शिरनामे सभागृहात उत्साहात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष सुनील आलम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यात सभासदांच्या हिताला प्राधान्य देऊन विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला..या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर आणि विभागीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. दत्तात्रय लाड उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष पद्मनाथ गरसुळे, सचिव सुवर्णा टिळेकर,.Agriculture Department: आकृतिबंधामुळे कृषी विभागाला नवी संस्थात्मक रचना.संचालक श्रीकृष्ण सावंत, अशोक पाटील, कल्पना वाकळे, वैशाली पावले, राजू बामगुडे, संजय अवचीते, डॉ. नरेंद्र काशीद, नितीन शेळके, अभिजीत मांढरे, सय्यद निसार, ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते..Desi Cow Research Center : देशी गोवंश संशोधन केंद्र महत्त्वाचे ठरणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.सभेत दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, शालेय साहित्य आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच सेवानिवृत्त सभासदांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या युवक-युवतींचाही या वेळी गौरव करण्यात आला..प्रास्ताविकात संचालक श्रीकृष्ण एस. सावंत यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा मांडला. अध्यक्षीय मनोगतात सुनील आलम यांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये पदाधिकारी, संचालक, सभासद आणि कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सभासदांच्या हिताला प्राधान्य देऊन संस्थेच्या विकासासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.प्रमुख पाहुणे डॉ. दत्तात्रय लाड आणि डॉ. सुभाष भालेकर यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे आणि पारदर्शक व्यवहाराचे कौतुक केले. सूत्रसंचालन व आभार निवेदक गणेश मोढवे यांनी मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.