हवामान अंदाज Weather Forecast: मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त अंदाजानुसार आज (ता. १५) रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज (ता. १५) रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी जिल्ह्यात तर उद्या (ता. १६) रोजी जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. आज १५ सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी, तर ता. १६ रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही..सामान्य सल्लाविस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात ता. १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहील.तातडीचा इशारा : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त अंदाजानुसार मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची सोय करावी. सुचविलेल्या फवारणी पावसाची उघडीप पाहून चिकटद्रव्यासह कराव्यात..सोयाबीनशेंगा लागणे ते शेंगा वाढीचीगेल्या काही दिवसातील सततचा पाऊस आणि संभाव्य पाऊस यांचा विचार करता सोयाबीन पिकात पाणी साचण्याची स्थिती उद्भवली आहे. हे पीक पाणी साचण्यासाठी संवेदनशील आहे, त्यामुळे या पिकातून पाण्याचा निचरा करून घ्यावा. शेतात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.पिकात पाने खाणाऱ्या अळी, शेंगा पोखरणारी अळी व खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या व्यवस्थापनासाठी, प्रति एकरी क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ %) ६० मि.लि. (०.३ मि.लि. प्रति लिटर) किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८%) १४० मि.लि. (०.७ मि.लि. प्रति लिटर) किंवा ॲसिटामाप्रीड (२५ %) अधिक बाईफेन्थ्रीन (२५ %) (संयुक्त कीटकनाशक १०० ग्रॅम (०.५ मि.लि. प्रति लिटर) किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (९.३ %) + अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.६ %) (संयुक्त किटकनाशक) ८० मि.लि. (०.४ मि.लि. प्रति लिटर) किंवा आयसोसायक्लोसिरम (९.२ %) २४० मि.लि. (१.२ मि.लि. प्रति लिटर) याप्रमाणे फवारणी पावसाची उघडीप पाहून करावी..Heavy Rain Alert : राज्यात आज पाऊस दणका देणार ; कोकण, घाटमाथ्यावर ऑरेंज तर राज्यभरात येलो अलर्ट.सततच्या ढगाळ व दमट हवामानामुळे सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसू येत आहेत. रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा, चारकोल रॉट आणि अन्य बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यास, त्यांच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल (१०%) अधिक सल्फर (६५ %) (संयुक्त बुरशीनाशक) ५०० ग्रॅम प्रति एकर किंवा टेब्युकोनॅझोल (२५.९ %) २५० मि.लि. किंवा पायरॅक्लोस्ट्रॉबीन (२०%) १५० ते २०० ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रॉबीन (१३.३ %) अधिक इपिक्साकोनॅझोल (५ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) ३०० मि.लि. प्रति एकर पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी.या काळात पिकात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी एकरी १० पिवळे चिकट सापळे पिकाच्या उंचीच्या वर लावावेत..सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे दिसत असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक रोगाच्या व्यवस्थापनासाठी पांढऱ्या माशीचे नियंत्रण आवश्यक आहे. त्यासाठी थायामेथोक्झाम (१२.६%) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.६% झेडसी) ५० मि.लि. किंवा ॲसिटामिप्रिड (२५%) अधिक बाइफेन्थ्रीन (२५% डब्ल्यूजी) १०० ग्रॅम किंवा बीटा सायफ्लुथ्रीन (८.४९ %) अधिक इमिडाक्लोप्रीड (१९.८१% ओडी) १४० मि.लि. प्रति एकर यापैकी एका कीटकनाशकाची पावसाची उघडीप बघून याप्रमाणे फवारणी करावी.सोयाबीन पिकात शेंगा वाढीसाठी मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (००:५२:३४) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी..ऊसवाढीचीऊस पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.अनेक ठिकाणी पिकात पांढरी माशीचा व पाकोळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी, लेकनिसिलिअम लेकॅनी या बुरशीजन्य कीटकनाशकाची ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.रासायनिक नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणीक्लोरपायरीफॉस (२० टक्के) ३ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के) ०.३ मि.लि. किंवा ॲसिफेट (७५ %) २ ग्रॅम.इमिडाक्लोपीड (१७.८%) या कीटकनाशकासोबत युरिया (२ टक्के) (२० ग्रॅम प्रति लिटर) मिसळता येईल.पोक्का बोइंग या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी प्रति लिटर पाणीकार्बेन्डाझिम (१२%) + मॅन्कोझेब (६३ % डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) ५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० % डब्ल्यूपी) २ ग्रॅमया द्रावणामध्ये चिकटद्रव्याचा वापर करावा. १० ते १२ दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारण्या पावसाची उघडीप पाहून कराव्यात.लाल कुज रोगाच्या व्यवस्थापनासाठी, ॲझॉक्सिस्ट्रॉबीन (१८.२ %) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ % एससी) (संयुक्त बुरशीनाशक) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या फवारणी करावी..संत्रा/ मोसंबीवाढीची/ फळवाढीचीबागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.फळवाढीसाठी मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (००:५२:३४) १.५ किलो अधिक जिबरेलिक ॲसिड १.५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.डाळिंबफळधारणा ते फळवाढीचीडाळिंब बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.डाळिंब झाडावरील अतिरिक्त फुटवे काढावेत.बागेत पोटॅशिअम सल्फेट (००:००:५०) १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी..Return Monsoon : मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू.भाजीपालाकाढणी/ वाढीचीभाजीपाला पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी प्रति लिटर पाणीपायरीप्रॉक्सीफेन (५ %) + फेनप्रोपाथ्रीन (१५ %) १ मि.लि किंवा डायमेथोएट (३० %) १.३ मि.लि.फुलशेतीकाढणी/ वाढीचीफुल पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या फूलपिकाची काढणी करून घ्यावी. जमिनीत वाफसा असताना फुल पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे..तुती बागतुती बागेस शेणखत देण्याची गरज आहे. मात्र बहुतांश रेशीम उद्योजक शेणखताची उपलब्धता कमी असल्यामुळे पर्यायी रासायनिक निविष्ठा देत आहेत. अन्य पिकांमध्येही नत्रयुक्त खतांचा अधिक वापर करत आहेत. ही बाब चुकीची असून, त्यामुळे जमिनीची प्रत खराब होत आहे. त्याऐवजी रेशीम कीटक संगोपनानंतर शिल्लक तुतीची पाने, फांद्या, रेशीम कीटकाची विष्ठा यापासून प्रति एकरी ६ टनापर्यंत, तर हेक्टरी १५ टनापर्यंत सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होतात. त्यापासून कंपोस्ट खत किंवा गांडूळखत तयार करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी १६ X ८ X ४ फूट आकाराच्या दोन खड्ड्यात ६ महिने तुतीचे शिल्लक अवशेष कुजवावेत. त्यातून उत्तम प्रकारचे खत उपलब्ध होते.पशुधन व्यवस्थापनजनावरांच्या गोठ्यात वाढलेली आर्द्रता गोचिडासह विविध कीटकाच्या वाढ व विकासासाठी पोषक असते. गोठ्यातील भेगा व फटीतील अंडी व इतर अर्भकावस्था गोठ्यातून काढून नष्ट कराव्यात..खरीप ज्वारी फुलोरा ते पोटरीखरीप ज्वारी पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी फवारणी प्रति लिटर पाणीइमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ०.४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.४ मि.लि.टीप - ही फवारणी कीटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे करावी..हळदकंद धरणेहळद पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी प्रति लिटर पाणीक्विनालफॉस (२५%) २ मि.लि. किंवा डायमिथोएट (३० %) १.५ मि.लि.स्टिकर मिसळून गरजेनुसार १५ दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून आणखी एक फवारणी करावी.उघडा पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा याच्या व्यवस्थापनासाठी, फवारणी प्रति लिटर पाणीकार्बेन्डाझीम (५० %) २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (७५ %) २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० %) २.५ ग्रॅम.हुमणीच्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटारायझीम ॲनिसोप्ली या बुरशीजन्य कीटकनाशकाचा ४ किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास १० किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा.डॉ. कैलास डाखोरे, ९४०९५४८२०२ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.