Kokan Agriculture: खरीप भातनिम गरव्या : पक्वता अवस्था गरव्या जाती : दाणे भरण्याची ते पक्वता अवस्था गरव्या भाताच्या जाती पुढील काही दिवसांत कापणीस तयार होतील. कापणीच्या ८ ते १० दिवस आधी शेतातील पाणी काढून टाकण्याची व्यवस्था करावी..निम गरव्या भाताच्या जाती आता कापणीस तयार झालेल्या आहेत. त्यामुळे पक्व निम गरव्या भाताच्या जातींची कापणी पावसाचा अंदाज घेऊन पाऊस नसताना कोरड्या हवामानात करावी. भात कापणीसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वैभव विळ्याचा वापर करावा. वैभव विळ्याच्या वापरामुळे भाताची कापणी जमिनीलगत होते. त्यामुळे अधिक पेंढा मिळतो. हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे कापणी केलेला भात शेतात जास्त वेळ ठेवू नये. तो त्वरित सुरक्षित ठिकाणी नेऊन लगेच मळणी करावी. मळणी केलेले धान्य कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी पसरून ठेवावे..Paddy Harvesting : भुदरगडमध्ये भात कापणीला वेग .कापणी केल्यानंतर धान्य ६ ते ७ दिवस उन्हात सुरक्षित ठिकाणी चांगले वाळवावे. जेणेकरून धान्यातील आर्द्रता सुमारे १० टक्क्यांपर्यंत कमी होईल. त्यामुळे धान्य सडणे व किडींचा प्रादुर्भाव होणे टाळले जाते. धान्य वाळविण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध नसल्यास, पर्यायी सुरक्षित व संरक्षित ठिकाणी धान्य वाळविण्याची व्यवस्था करावी..कापणी केल्यानंतर धान्य ६ ते ७ दिवस उन्हात सुरक्षित ठिकाणी चांगले वाळवावे. जेणेकरून धान्यातील आर्द्रता सुमारे १० टक्क्यांपर्यंत कमी होईल. त्यामुळे धान्य सडणे व किडींचा प्रादुर्भाव होणे टाळले जाते. धान्य वाळविण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध नसल्यास, पर्यायी सुरक्षित व संरक्षित ठिकाणी धान्य वाळविण्याची व्यवस्था करावी.धान्य साठवणुकीसाठी कोरडी बारदाने वापरावीत. धान्याची पोती स्वच्छ, हवाबंद खोलीत साठवावीत. पोती जमिनीवर थेट ठेवू नयेत. ती सिमेंटच्या ओट्यावर किंवा लाकडी फळ्यांवर १ ते २ फूट उंचीवर रचावीत. भिंतीपासून पुरेसे अंतर ठेवावे. जेणेकरून ओलावा येणार नाही..सुरक्षित धान्य साठवण करण्यासाठी कडुनिंबाची पाने किंवा निंबोळीचा चुरा धान्यात मिसळल्यास साठवणुकीवेळी कीड नियंत्रण होण्यास मदत होते. भात बांबूच्या तट्ट्यात किंवा बारदानात साठवता येतो. तट्टा शेणमातीने सारवून उन्हात वाळवावा, त्यात भात भरावा व वरती कोरडा पेंढा किंवा गवत दाबून झाकण ठेवावे.धान्य साठवणुकीच्या खोलीत हवेशीरपणा राखावा. उंदरांची बिळे वेळोवेळी तपासावीत. खोलीत अडगळ ठेवू नये, कारण त्यात उंदरांना आसरा मिळतो. उंदीरनाशक वापरायचे असल्यास प्रथम ५ ते ६ दिवस विष न घातलेले आमिष ठेवून उंदरांना सवय करून द्यावी. त्यानंतर विषारी आमिषाचा वापर करावा. आमिष घालताना जवळचा पाणीसाठा झाकून ठेवावा..Paddy Farming : भातशेतीने घरखर्चाचे आर्थिक गणित बिघडले.भातावर लहान पतंग अंडी घालू नयेत, म्हणून साठवण खोलीत दररोज २ ते ३ तास १४ वॉटचा बल्ब लावून त्याखाली पाण्याने भरलेले उथळ भांडे ठेवावे. पतंग प्रकाशाकडे आकर्षित होऊन भांड्यात पडून मरतात व भात सुरक्षित राहतो..कुळीथकुळीथ पिकामध्ये पूर्वमशागत आणि पेरणीची कामे दिनांक २४ ते २९ ऑक्टोबर रोजी अनुकूल हवामान पाऊस नसताना सुरू ठेवावी.कुळीथ पेरणीसाठी जमिनीची उभी-आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून घ्यावीत. नांगरणी वेळेस चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्टखत ५० किलो प्रति गुंठा प्रमाणे मिसळून जमीन समपातळीत आणावी.पेरणी ओळीत ३० सें.मी. अंतर ठेवून करावी..पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणांस २.५ ग्रॅम थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करून त्यानंतर रायझोबियम २५ ग्रॅम या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. प्रक्रिया केल्यानंतर लगेच पेरणी करावी. पिकाला पेरणीच्या वेळेस युरिया ५४० ग्रॅम आणि सिंगल सुपर फॉस्फेट ३ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश १ किलो प्रति गुंठा प्रमाणे ओळीत मातीमध्ये मिसळून द्यावीत.संपर्क : ८८०६४०६८५०- डॉ. वीरेश चव्हाण (नोडल अधिकारी), ९४२२०६५३४४(कृषिविद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.