Agriculture Tips: भात निळे भुंगेरे :पाणथळ जमिनीतील भात लागवडीमध्ये जिथे पाण्याचा निचरा होण्याची सोय नाही तिथे पाणी साचून राहते. त्यामुळे निळ्या भुंगेरे या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. किडीच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे नियमितपणे निरीक्षण करावे. खाचरात पाणी खेळते राहील असे पाहावे. खाचरात पाणी जास्त काळ न साठविता २ ते ३ दिवसांच्या अंतराने फोडून लावून नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून पिकावर किडींचा प्रादुर्भावावर आळा घालण्यास मदत होईल. .किडीच्या अळी आणि प्रौढावस्था या दोन्ही अवस्था हानिकारक आहेत.ही कीड पानाचा हिरवा भाग खरवडून खाते. त्यामुळे पानांवर पांढरे डाग दिसून येतात. पाणी साचलेल्या परिस्थितीत आणि जास्त नत्र वापरल्यास या किडीची वाढ होऊ शकते.रासायनिक नियंत्रण (प्रति १० लिटर पाणी)क्विनॉलफॉस (२५ टक्के ईसी) ४० मिलि किंवालॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ टक्के ईसी) ५ मिलि या प्रमाणे पाऊस नसताना फवारणी करावी..पाने गुंडाळणारी अळी :या किडीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी भात शेतीतील बांध तणमुक्त ठेवावेत.रासायनिक नियंत्रण (प्रति १० लिटर पाणी)क्विनॉलफॉस (२० टक्के एएफ) १८ मिलि किंवालॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ टक्के ईसी) ५ मिलि किंवाक्लोरपायरीफॉस (२० टक्के ईसी) ४० मिलियाप्रमाणे प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी..Crop Advisory: कृषी सल्ला: कोकण विभाग.खोडकीड :भात लागवडीमध्ये शेतात ५ टक्के कीडग्रस्त फुटवे आढळून आल्यास किंवा एकचौरस मीटर क्षेत्रात किडीचा एक अंडीपुंज आढळून आल्यास रासायनिक उपाययोजना कराव्यात.रासायनिक नियंत्रण (प्रति १० लिटर पाणी)क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) १८ मिलि किंवाकारटाप हायड्रोक्लोराइड (५० टक्के प्रवाही) १२ ग्रॅम किंवालॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ टक्के प्रवाही ५ मिलिपाणथळ भागामध्ये पाण्याचा निचरा करून बांध बांधून नंतर दाणेदार कीटकनाशकांचा वापर करावा.खोड किडींच्या नियंत्रणासाठी शेतामध्ये २० ते २५ मीटर अंतरावर एक याप्रमाणे २० गंध सापळे लावावेत. फुटवे अवस्थेत देण्यात येणाऱ्या नत्र खताच्या मात्रेसोबत दाणेदार कीटकनाशकाचा वापर करावा..बुरशीजन्य करपाया रोगाचा प्रादुर्भाव भात पिकाच्या वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये दिसून येऊ शकतो. रोगाच्या व्यवस्थापनासाठी,रासायनिक नियंत्रण (प्रति १० लिटर पाणी)ट्रायसायक्लॅझोल (७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) १० ग्रॅमयाप्रमाणे रोगाची लक्षणे दिसून येताच फवारणी करावी. पुढील दोन फवारण्या २१ दिवसांच्या अंतराने घ्याव्यात..पर्णकोष करपाया रोगाच्या प्रादुर्भावामध्ये भात चुडाच्या तळाशी खोडावर तपकिरी रंगाचे अनियमित आकाराचे लांबट ठिपके तयार होतात.हळूहळू रोग वाढत जाऊन शेंडे पानावरील आवरण तपकिरी होऊन कुजते. पानांवर असंख्य फिक्कट पिवळ्या रंगाचे वलय असलेले तपकिरी ठिपकेपडतात. हे ठिपके एकत्र मिसळून पान करपते. लोंबी येण्याच्या कालावधीत पाऊस झाल्यास रोगाची तीव्रता वाढते. बरेचसे दाणे भरत नाहीत. रोगाची लक्षणे दिसून येताच,कॉपर ॲाक्झिक्लोराईड २५ ग्रॅम किंवामॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवाकार्बेन्डाझिम १० ग्रॅमया पैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. नंतर रोगाची तीव्रता बघून दर पंधरा दिवसांनी नंतरच्या फवारण्या कराव्यात..Crop Advisory: कृषी सल्ला ( मराठवाडा विभाग).हळदहळद पिकामध्ये मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जास्त पावसात आणि पाण्याचा निचरा कमी असलेल्या भागात या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. या रोगाचा पुढील प्रसार रोखण्यासाठी मर झालेले झाडे गड्ड्यासहित काढून घ्यावीत. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी जमिनीमध्ये शिफारशीत घटकांची झाडाच्या बुंध्यात आळवणी करावी.हळद पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठीप्रोपिकोनॅझोल बुरशीनाशक १० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दर १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. रोगाच्या तीव्रतेनुसार एकूण दोन फवारण्या २० ते ३० दिवसांच्या अंतराने द्याव्यात..वेलवर्गीय भाजीपालावेलवर्गीय भाजीपाला लागवडीमधून अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.वेलवर्गीय भाजीपाला फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. फळमाशीच्या नियंत्रणासाठी पिकांमध्ये क्यू ल्यूर रक्षक सापळे प्रति एकरी २ प्रमाणे मंडपात जमिनीपासून १ ते २ फूट उंचीवर टांगावेत.वेलवर्गीय भाजीपाल्यावर पर्ण करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी, रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. नियंत्रणासाठी प्रति लिटर पाण्यात मॅन्कोझेब २.५ ग्रॅम याप्रमाणे मिसळून १० ते १५ दिवसांनी फवारणी करावी..दोडक्यावरील पर्ण करपा रोगाच्या नियंत्रणासाठी,(फवारणी ः प्रति लिटर पाणी)मॅन्कोझेब (०.२५ टक्का) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (०.२५ टक्का) २.५ ग्रॅम याप्रमाणे पेरणीनंतर ३० दिवसांनी व नंतर दर १० दिवसांनी फवारणी करावी.काकडी पिकामध्ये पर्ण करप्याच्या नियंत्रणासाठी पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी, (प्रति लिटर पाणी)मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) (०.२ टक्के) २ ग्रॅम प्रमाणे फवारणी करावी.या फवारणीनंतर कॉपर ऑक्सिक्लोराइड (०.२५ टक्का) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे पंधरा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात..चिकूचिकू बागेतून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.नवीन लागवड केलेल्या रोपांच्या बुंध्याजवळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.चिकू बागेत खाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.फायटोप्थोराचा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी,मेटालॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम अधिक स्टिकर १ मिलि प्रति लिटर पाण्यात या बुरशीनाशकाची खोड, फांद्या व संपूर्ण झाडावर फवारणी करावी.८८०६४०६८५०- डॉ. वीरेश चव्हाण (नोडल अधिकारी), ९४२२०६५३४४(कृषिविद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)(ॲग्रेस्को शिफारस आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.