Washim News: एकीकडे राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मागेल त्याला सौर पंप’ या योजनेच्या कार्याचा गौरव म्हणून नुकताच मोठा सोहळा झाला. मात्र, ज्यांनी सौरपंप लावलेले आहेत, अशा बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कंपन्यांकडून पंप लावल्यानंतर सेवा मिळत नाही. .सौर पंपांसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविले जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. याबाबत तालुक्यातील अरविंद देशमुख (रा. करडा) यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करीत या गोंधळाबद्दलची वस्तुस्थिती मांडली आहे..Solar Agri Pump: सौर कृषिपंपामुळे रात्रीच्या जागरणातून सुटका .सौर पंप चालत नसल्यामुळे व वीज जोडणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. नुकताच महावितरणने संभाजीनगर येथे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा साजरा केला. परंतु या योजनेची सत्य परिस्थिती वेगळीच असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. करडा येथील शेतकरी श्री. देशमुख यांनी सौर पंपासंदर्भात संबंधित कंपनीच्या विरोधात राज्याचे ऊर्जामंत्री, अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा), महावितरण व्यवस्थापकीय संचालक व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे..Solar Pump Connection : सौर पंपासाठी एकरची अट रद्द करावी; विधानसभेत आमदार सिद्धार्थ खरातांची मागणी .वडील केशवराव ग्यानबा देशमुख यांच्या नावे खडकी सदार शिवारात असलेल्या शेतात सौरपंपासाठी अर्ज केला होता. संबंधित कंपनीने अर्ज मंजूर केला आणि देशमुख यांना कंपनीचा संच मिळाला. पण मागील १५ महिन्यांपासून तो नादुरुस्त आहे..कंपनीने पुरवलेल्या साहित्याचा दर्जा चांगला नसल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावे या उद्देशाने शासनामार्फत सौर कृषीपंपाला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, कंपन्यांकडून सेवा मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत, असेही देशमुख यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.