Government Suspends 15 Farm Service Licenses: पुणे जिल्ह्यात पॉस (PoS) प्रणालीवर युरिया खतांचा साठा अद्ययावत न ठेवल्यामुळे कृषी विभागाने कडक कारवाई करत १५ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. निलंबन कालावधीत संबंधित विक्रेत्यांना सर्व प्रकारच्या खत विक्रीवर बंदी घालण्यात आली असून शेतकऱ्यांनी अशा विक्रेत्यांकडून खते खरेदी करू नयेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे..जिल्ह्यातील युरिया खताचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी १ एप्रिलपासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत विक्रेत्यांकडील पॉस मशिनवरील साठा आणि प्रत्यक्ष विक्री केंद्रातील साठा यांची पडताळणी करण्यात आली. तपासणीदरम्यान सुमारे ३५०० टन युरिया खताचा साठा पॉस प्रणालीवर नोंदवलेला नसल्याचे आढळून आले. संबंधित विसंगती दूर करून साठा अद्ययावत करण्यात आला आहे..Fertilizer Shop License Suspension: चौदा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित.या कारवाईमुळे खरीप हंगामात खताची वस्तुनिष्ठ उपलब्धता आणि योग्य पुरवठा नियोजन करण्यास जिल्हा कृषी कार्यालयाला मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित विक्रेत्यांना वेळोवेळी सूचना व संधी देऊनही त्यांनी नियमांचे पालन न केल्याने अखेर दंडात्मक कारवाई करण्यात आली..कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत आणि नियमांचे पालन करणाऱ्या विक्रेत्यांकडूनच खते खरेदी करण्याचे आवाहन केले असून, खत वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी पुढेही अशा तपासण्या सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे..Fertilizer Shop License Suspension: नाशिक जिल्ह्यात १७ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबित.निलंबित परवाना धारकांची नावे :तालुका -- निलंबित परवाना धारकाचे नावदौंड --- आदिती कृषी सेवा केंद्र, लिंगाळीदौंड --- बळीराजा ॲग्रो एजन्सी, देऊळगाव राजेदौंड --- शिव कृपा ॲग्रो एजन्सी, पिंपळगावदौंड --- नंदाई ॲग्रो सर्विसेस, नंदादेवीदौंड --- बिरोबा कृषी सेवा केंद्र, बिरोबा वाडीदौंड --- श्रीराम कृषी भंडार हिंगणी बेर्डेदौंड --- श्रीनाथ ॲग्रो सर्विसेस राह.इंदापूर --- महेश फर्टिलायझर आगोती नंबर १इंदापूर --- गणेश ॲग्रो एजन्सी कळसशिरूर --- विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र मांडवगण फराटाजुन्नर --- विघ्नहर कृषी सेवा केंद्र नारायणगावजुन्नर --- कृषी शक्ती ॲग्रो एजन्सी जुन्नरजुन्नर --- पाटील कृषी सेवा केंद्र बेल्हेआंबेगाव -- शेतकरी राजा कृषी उद्योग गावडेवाडीभोर -- श्री भैरवनाथ शेती भांडार वेळ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.