Farmers Protest : पंढरपूर जोपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सातबारा उतारा कोरा होत नाही, तोपर्यंत आम्ही महायुती सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. यापुढे आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सत्ताधाऱ्यांच्या गाड्या आडवू. यासाठी आम्हाला तुरुंगात बसावे लागले तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेवटपर्यंत लढत राहू, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (ता. २६) येथे दिला..राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत सरकारविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार राजू खरे, उद्योग व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, सक्षणा सलगर, संदीप मांडवे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते..Maharashtra Drought Situation: दुष्काळात सरकारचे डोळे आभाळाकडे.खासदार सुळे म्हणाल्या, राज्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळजन्य परिस्थिती आहे. शेतकरी पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी तडफडतोय. तरीही सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. सरकारने आज दुष्काळ जाहीर करून केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. यामध्ये कोणतीही भरीव अशी मदत करण्यात आली नाही. खरिपातील पिके जळून गेली आहेत, रब्बीची पेरणी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरसकट कर्जमाफी द्यावी आणि प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली..सरकारकडे शेतकऱ्यांना मदत करायला पैसे नाहीत, मात्र तिकडे शक्तिपीठ महामार्गासाठी १ लाख कोटी रुपये आहेत. शक्तिपीठ महामार्ग रद्द करून सगळा निधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरला पाहिजे, असेही सुळे यांनी सरकारला सुनावले. वसंतराव देशमुख यांनी प्रास्ताविक केले..Maharashtra Drought: केवळ दुष्काळाची घोषणा नको! शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या, शेतकरी नेत्यांची मागणी.सरकारचा कडेलोट कर : शिंदेप्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, हे सरकार शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे. अशा या महायुती सरकारचा कडेलोट व्हायला पाहिजे, अशी मी पांडुरंगाकडे प्रार्थना केली आहे..दुष्काळ जाहीर झाला अन् वातावरण नरम झालेदुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने आज मोर्चाचे नियोजन केले. सकाळी मोर्चासाठी नेतेमंडळी पंढरपुरात दाखल झाली. मोर्चा सुरू होण्यापूर्वीच दुष्काळ जाहीर झाल्याची बातमी आली. त्यामुळे वातावरण काहीसे नरम झाले. शासनाने काढलेल्या जीआरचा अभ्यास करून मोर्चा काढायचा की नाही, याबाबत विचार करू, असे सुप्रिया सुळे यांनी सकाळी सांगितले. दरम्यान, काही वेळाने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा काढण्यात आला. स्टेशन रोड मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला..आमदार अभिजित पाटील यांची मोर्चाला दांडीदोन दिवसांपूर्वी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीला उपस्थित राहून सरकारविरोधात भूमिका मांडणारे माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी ऐनवेळी मोर्चाला दांडी मारल्याचे दिसून आले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत आमदार अभिजित पाटील मोर्चाला येणार, अशी चर्चा होती. परंतु प्रत्यक्ष मोर्चा सुरू झाला. त्यानंतर सभाही संपली, तरी आमदार अभिजित पाटील मोर्चात आले नाहीत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.