Nagpur News: पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप हंगाम नुकसानीचा ठरला आहे. त्यातच पीकविम्याचे संरक्षण असलेल्या सोयाबीन पिकाचे पाच जिल्ह्यांत २ हजार १२७ पीक कापणी प्रयोग झाले. मात्र, विमा कंपन्यांकडून भरपाईस दिरंगाई होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. .खरीप हंगामात कापूस, तूर, तांदूळ, ज्वारी, भुईमूग, उडीद, मूग या पिकांसाठी विमा काढण्यात आला. पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्यांतील ४ लाख २१ हजार ९०३ शेतकऱ्यांनी पिकांना विमा घेत ३ लाख १५ हजार १८ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले. यापैकी खरीप हंगामातील सोयाबीन पिकांचे पीक कापणी प्रयोग कृषी विभागाकडून पूर्ण करण्यात आले..Crop Insurance: रब्बी हंगामात शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ.याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. दावा प्रक्रियेत महत्त्वाचे पाऊल मानल्या जाणाऱ्या पीक कापणी प्रयोगांद्वारे प्रत्येक सर्कलमधील प्रत्यक्ष उत्पादनाचा अंदाज काढला जातो. ही माहिती विमा कंपनी व शासनाला नुकसान भरपाई निश्चित करण्यात महत्त्वाची आहे..कापणी प्रयोग पूर्ण झाले असले तरी पंचनामे, डेटा अपलोड, पडताळणी आणि विमा कंपनीकडील मंजुरीची प्रक्रिया यात वेळ जात आहे. त्यामुळे नुकसानभरपाई कधी मिळणार हे सांगणे कठीण असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे..Crop Insurance: फळपीक विम्याचे ८६० कोटी रुपये वितरित; उरलेली लवकरच जमा करणार.‘भरपाईबाबत स्पष्टता नाही’कापणी प्रयोगांमधील आकडेवारीच्या आधारे प्रत्यक्ष उतारा ठरविण्यात येणार आहे. यात घट झालेल्या प्रमाणात विमा रकमेची गणना केली जाईल. उतारा जितका कमी तितकी भरपाई अधिक मिळणार आहे. पेरणीनंतर ३० दिवसांनंतर पण काढणीपूर्वी पिकाचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्यास मध्यावधी भरपाई मिळणार आहे. मात्र ही रक्कम किती असेल हे निश्चित नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले..जिल्हानिहाय पीक कापणी प्रयोगजिल्हा प्रयोगवर्धा ५८८नागपूर ९९६भंडारा ९६गोंदिया ००चंद्रपूर ४२०गडचिरोली २७एकूण २१२७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.