Kolhapur News: काटामारी करणाऱ्या कारखान्यांचा लोकवर्गणीतून शेतकऱ्यांच्या मालकीचा वजन काटा उभारून भागातील काटामारी रोखण्यात यश आले. आता उसाची रिकव्हरी काढणारी प्रयोगशाळा उभारून रिकव्हरीमध्ये होणारी लूट चव्हाट्यावर आणणार असल्याचा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिला. .शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावर असणाऱ्या शेतकरी वजन काट्यावर आंदोलन अंकुशच्यावतीने लोकवर्गणीतून उसाची रिकव्हरी काढणारी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी सोमवारपासून (ता.२६) निधी संकलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी श्री चुडमुंगे बोलत होते. ते म्हणाले, की शेतकऱ्यांच्या उसाचा दर हा कारखान्यांच्या रिकव्हरीवर ठरला जातो. पण कारखाने रिकव्हरी चोरतात. .Sugarcane Weighing Irregularities: उसाची काटामारी आणि अपघात रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय.त्यामुळे आपल्याला उसाचा दर कमी मिळतो अशी शेतकऱ्यांची भावना आहे. रिकव्हरी काढणारी त्रयस्थ व्यवस्था खरे तर सरकारनेच निर्माण करायला हवी होती. कारखानदारच सरकारमध्ये असल्याने अशी व्यवस्था केली नाही. ती व्यवस्था आता आम्ही निर्माण करून सत्य समोर आणण्याचे काम या प्रयोगशाळेच्या माध्यमातून केले जाणार आहे..Weight Loss Secrets : एका क्लिवर वाचा झपाट्याने वजन कमी करणारी सिक्रेट रेसिपी.जिल्हा प्रमुख दिपक पाटील म्हणाले, की तालुक्यातील प्रत्येक गावातून दानशूर व्यक्ती आणि शेतकऱ्याकडून निधी गोळा करून येत्या हंगामापर्यंत प्रयोगशाळा सुरु करण्याचा संकल्प आहे. पहिल्याच दिवशी ६० हजाराहून अधिक निधी जमा झाला. तालुक्यातील शेतकऱ्यांनी निधी संकलनास सहकार्य करण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष नागेश काळे यांनी केले..यावेळी उपाध्यक्ष संभाजी शिंदे, रघुनाथ पाटील, संजय चौगुले, उद्धव मगदूम, जितेंद्र चौगुले, दत्तात्रय जगदाळे, पिंटू ढेकळे, नामदेव माळी, रशीद मुल्ला, धनाजी माने, भूषण गंगावणे, भारत ढाले, दिपक काळे, विक्रम बाबर, चिदानंद आलोळी, पोपट संकपाळ, देवेंद्र चौगुले, कृष्णा देशमुख, योगेश जाधव, अमर सावंत, सोमनाथ तेली, मुसा जमादार, पप्पू काळे, राजाराम जाधव, महेश जाधव, बंटी माळी, राहूल काकडे, महेश आवळेकर, अभिजित आवळेकर, प्रदीप पाटील, पोपट परीट, शिवाजी काळे, अनिल हुपरीकर, प्रशांत थोरवत, अजय ढवळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.