Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यात सलग पाच वर्षाच्या कालावधीनंतर यावर्षीच्या (२०२५) ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.ऑगस्ट मध्ये परभणी जिल्ह्यात सरासरी २२७.८ मिलिमीटर अपेक्षित असतांना यंदा २६१.२ मिलिमीटर (११४.७ टक्के) तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी २४१.२ मिलिमीटर अपेक्षित असतांना यंदा प्रत्यक्षात ३५५.१ मिलिमीटर (१४७.२ टक्के) पाऊस झाला. .परभणी जिल्ह्यात ३६.४ मिलिमीटर तर हिंगोली जिल्ह्यात ११४.९ मिलिमीटर जास्त पाऊस झाला.परंतु या दोन जिल्ह्यातील २२ मंडलात सरासरीहून कमी पाऊस झाला. परभणी व हिंगोली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात २०२० ते २०२४ अशी सलग पाच वर्षे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता.परंतु यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने या दोन जिल्ह्यातील ऑगस्ट मधील कमी पावसाची स्थिती खंडित झाली..Heavy Rainfall: मालेगावला पावणेदोन हजार हेक्टरला फटका.परभणी जिल्ह्यातील २१ मंडलात कमी पाऊसयंदा ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील ५२ पैकी २१ मंडलात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यात परभणी मंडलात ९३.४ टक्के, पेडगाव ७६.१, जांब ६२.१, सिंगणापूर ९१.८, दैठणा ९१.३, टाकळी कुंभकर्ण ८०.४ टक्के, सावंगी म्हाळसा ९८.६, बामणी ९७.२, चारठाणा ७२.७ टक्के, वाघी धानोरा ७९ टक्के, सेलू ८४ टक्के, देऊळगाव गात ८४, वालूर ६४.६, कुपटा ९०.१, चिकलठाणा ६२.७ टक्के, मोरेगाव ७२.८, मानवत ९७.८, केकरजवळा ८१.३, कोल्हा ८३.२, ताडबोरगाव ७१.१, हादगाव ८९.८ टक्के पाऊस झाला. .उर्वरित ३१ मंडलात सरासरीच्या तुलनेत १०२ टक्के ते २०१.२ टक्के पाऊस झाला. सर्वाधिक ताडकळस मंडलात ४६२ मिलिमीटर (२०१.२ टक्के) तर सर्वात कमी चिकलठाणा मंडलात १५९.२ मिलिमीटर (६२.७ टक्के) पाऊस झाला. जून ते ऑगस्ट या कालावधीत सरासरी ५९२.३ मिलिमीटर अपेक्षित असतांना यंदा प्रत्यक्षात ५६८.५ मिलिमीटर (९६ टक्के) पाऊस झाला. २०२४ मध्ये ५५९.५ (९४.५ टक्के) पाऊस झाला होता..Heavy Rainfall: पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर मंडलात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका.हिंगोली जिल्ह्यात १ मंडलात कमी पाऊस...यंदा ऑगस्ट महिन्यात हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी केवळ साखरा मंडलात सरासरीहून कमी पाऊस झाला. मात्र इतर २९ मंडळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सर्वात कमी साखरा मंडलात १५३.५ मिलिमीटर ( ७२ टक्के) तर सर्वाधिक वाकोडी मंडलात ५८०.७ मिलिमीटर (२३३.३ टक्के) पाऊस झाला. जून ते ऑगस्ट कालावधीत सरासरी ६४०.६ मिलिमीटर अपेक्षित असतांना यंदा प्रत्यक्षात ७२५.२मिलिमीटर (११३.२ टक्के) पाऊस झाला. २०२४ मध्ये ५७५.८ मिलिमीटर (८९.९टक्के) पाऊस झाला होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.