डॉ. ज्योती माने, डॉ. याहयाखान पठाण, डॉ. सुनीता चौगुलेपशुधनातील मायकोटॉक्सिन्स हे अदृश्य पण गंभीर आव्हान असून त्यांचा परिणाम दीर्घकालीन आणि आर्थिकदृष्ट्या हानिकारक ठरतो. परंतु योग्य खाद्य व्यवस्थापन, साठवणूक, तपासणी आणि बाइंडर्सचा वापर या प्रभावी उपाय तसेच पशुपालकांनी जागरूकता व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्यास पशुधनाचे आरोग्य, उत्पादनक्षमता सुरक्षित राहील. .पशुधनाच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये मायकोटॉक्सिन्स हे अदृश्य पण गंभीर आव्हान आहे. बुरशीजन्य धान्य, चारा व खाद्य घटकांद्वारे शरीरात प्रवेश करणारे हे विषारी रासायनिक घटक दीर्घकालीन परिणाम घडवतात. आजच्या काळात बदलते हवामान, वाढती आर्द्रता, अयोग्य साठवणूक पद्धती आणि खाद्य सुरक्षेतील त्रुटी यामुळे मायकोटॉक्सिन निर्मितीचा धोका वाढत असून, विषाणूजन्य आणि जिवाणूजन्य रोगांप्रमाणे ते वेगाने पसरत नसले तरी उत्पादनक्षमता घटवून पशुपालनावर दीर्घकालीन परिणाम करतात. त्यांच्या व्यापक प्रसार आणि जैव-पर्यावरणीय आरोग्यावर होणाऱ्या परिणामांमुळे मायकोटॉक्सिन्सच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे..Livestock Vaccination Campaign: ‘लाळ्या खुरकूत’ प्रतिबंधक लसीकरण मोहीम १३ ऑगस्टपासून.मायकोटॉक्सिन्स हे बुरशीच्या काही प्रजातींनी तयार केलेले विषारी रासायनिक घटक आहेत. हे प्रामुख्याने Aspergillus, Fusarium, Penicillium इ. बुरशीच्या वाढीदरम्यान तयार होणारे असून, बुरशीयुक्त धान्य, साठवलेला चारा, खाद्य घटक आणि मिश्रित पशुखाद्य यांद्वारे पशुधनाच्या शरीरात प्रवेश करतात. मायकोटॉक्सिन्समुळे होणाऱ्या अफ्लाटॉक्सिकॉसिस, झिएरालेनोन विषबाधा, ओक्राटॉक्सिकॉसिस, ट्रायकोथेसीन विषबाधा, इर्गोटिझम इत्यादी आजारांना एकत्रितपणे मायकोटॉक्सिकॉसिस असे म्हणतात. मायकोटॉक्सिकॉसिस प्रकारातील अफ्लाटॉक्सिकॉसिस हा पशुधनाच्या आरोग्य व चारा नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि जागतिक पातळीवर सर्वाधिक अभ्यासाला गेलेला आजार आहे..अफ्लाटॉक्सिनहा मुख्यत्वे अन्नधान्य आणि कडधान्यांमध्ये आढळणारा एक अत्यंत विषारी आणि घातक घटक आहे. हा घटक ॲस्परजिलस बुरशीमुळे तयार होतो. शेतातील पिकांची काढणी आणि साठवणूक योग्य प्रकारे न केल्यास ही बुरशी वाढून विषारी अफ्लाटॉक्सिन तयार होते..प्रसारदूध आणि दुग्धजन्य पदार्थ : पशुधनाने अफ्लाटॉक्सिनयुक्त खाद्य खाल्ल्यास, दुधात ‘एम१’ नावाचे विष प्रवेश करते. हे विष दुधाला उकळल्याने किंवा प्रक्रिया केल्याने नष्ट होत नसून दूध व दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यास मानवाच्या यकृताला गंभीर धोका निर्माण करतात..आरोग्यअफ्लाटॉक्सिन प्राण्यांच्या शरीरातील प्रथिनांचे शोषण रोखते, ज्यामुळे त्यांची दूध देण्याची क्षमता कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती मंदावते..मांस आणि अंडीदूषित खाद्य खाणाऱ्या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये आणि पशुधनाच्या मांसामध्येही हे विषारी घटक साठतात. असे मांस व अंडी खाण्यामुळे मानवामध्ये कर्करोगाचा धोका वाढतो..दुष्परिणामरोगप्रतिकारशक्तीवर आघातअफ्लाटॉक्सिन पशुधनाच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमतेवर आघात करून ती कमी करतात. परिणामी, पशुधन जिवाणू आणि विषाणूजन्य संसर्गास अधिक संवेदनशील होऊन लसीकरणानंतर अपेक्षित प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास अडथळा येतो आणि रोग नियंत्रण कार्यक्रमांची परिणामकारकता कमी होऊ शकते..Livestock Vaccination: पशुधन लसीकरण संथ गतीने.दीर्घकालीन परिणामअफ्लाटॉक्सिनचा परिणाम अनेकदा हळूहळू आणि सुप्त स्वरूपात दिसून येतो. सुरुवातीच्या अवस्थेत स्पष्ट लक्षणे दिसून येत नसल्यामुळे या समस्येकडे अनेकदा दुर्लक्ष होते. मात्र दीर्घकाळ अफ्लाटॉक्सिनयुक्त खाद्य सेवन केल्यास पशुधनाच्या शरीरातील विविध अवयवांवर विपरीत परिणाम होतो.पशुधनामध्ये अफ्लाटॉक्सिनचा थेट परिणाम हा वाढ, खाद्य रूपांतर क्षमता, दूध उत्पादन, मांस उत्पादन, अंडी उत्पादन आणि प्रजनन कार्यक्षमतेवर होऊन पशुपालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते..उपचारांमधील मर्यादाअफ्लाटॉक्सिन हे रासायनिक स्वरूपाचे विषारी संयुग असल्यामुळे प्रतिजैविकांची परिणामहीनता अथवा लसमात्रांची अनुपलब्धता यामुळे गुणवत्तापूर्ण खाद्य व्यवस्थापन, योग्य साठवणूक, नियमित खाद्य तपासणी हीच प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना ठरते..नियंत्रणाच्या पद्धतीओलावा नियंत्रणजनावरांच्या खाद्यात किंवा धान्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा कमी असावे. जास्त ओलावा बुरशी वाढण्यास कारणीभूत ठरतो..रासायनिक प्रक्रियासाठवणूक केलेल्या धान्यावर किंवा पेंडीवर अँहाइड्रस अमोनिया किंवा प्रोपिओनिक ॲसिडची प्रक्रिया करून बुरशी नष्ट केली जाते.योग्य साठवणूकखाद्याची पोती जमिनीपासून वर लाकडी फळ्यांवर ठेवावीत; भिंतीला टेकवून ठेवू नयेत, जेणेकरून दमटपणा निर्माण होणार नाही..मायकोटॉक्सिन बाइंडर्सजनावरांच्या खाद्यामध्ये टॉनिक किंवा टॉक्सिन बाइंडर्सची पावडर मिसळली जाते. जनावरांच्या पोटात गेल्यावर ही पावडर एखाद्या ‘स्पंज’सारखे काम करते. ते खाद्यातील विषारी घटकांना (टॉक्सिन्स) स्वतःकडे खेचून बांधून ठेवते आणि विष्ठेवाटे शरीराबाहेर टाकते, ज्यामुळे विष यकृतात किंवा दुधात शोषले जात नाही.- डॉ. सुनीता चौगुले९८६०५५५४४०(पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मित संस्था, औंध, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.