Buldhana News: आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य निवासी शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रवेशासाठी परीक्षा एक मार्च रोजी होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज ३० जानेवारीपर्यंत प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकांमार्फत सादर करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे..बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये पाचवी, सहावी, सातवी व आठवी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी सदर स्पर्धा परीक्षेसाठी पात्र राहतील..Model School: साखरा शाळेची गुणवत्ता, शिक्षकांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे.या सर्व शाळांतील मुख्याध्यापकांनी प्रवेश परीक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांकडून भरून घेऊन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला या कार्यालयाकडे सादर करावे. विहित नमुन्यातील अर्ज संबंधित आदिवासी शासकीय/अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्याकडे विनामूल्य उपलब्ध आहेत. परीक्षेचा अर्ज ३० जानेवारीपर्यंत प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकांमार्फत सादर करावा..Pune Cluster School : पुणे जिल्ह्यातील वाडा येथे दुसरी समूह शाळा.सदर अर्जासोबत बोनाफाईड दाखला, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या वार्षिक उत्पन्नाचा तसेच पालकांचा/ विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला आवेदन पत्रा सोबत जोडण्यात यावा. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा एक मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत शासकीय आश्रमशाळा,कोथळी (ता.बार्शिटाकळी, जि. अकोला ).येथे होईल. इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा याच तारखेला दुपारी ११ ते २ या वेळेत शासकीयआश्रमशाळा (घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथे होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.