Hingoli News: जल महोत्सव अभियानांतर्गत आडगाव मुटकुळे (ता. हिंगोली) येथे जल अर्पण दिन कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता. १४ ) करण्यात आले होते. या वेळी जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचे ग्रामस्थांना हस्तांतर करण्यात आले..ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद हिंगोली व पंचायत समिती हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे अध्यक्ष राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थिती होती..Jal Jeevan Mission: 'जल जीवन'साठी केंद्राकडून निधीच नाही, २५ हजार काम ठप्पे.यावेळी उप विभागीय अधिकारी योगेशकुमार मीना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) समृद्धी दिवाने, कार्यकारी अभियंता श्री. नरवाडे, गटविकास अधिकारी माया वानखेडे, उपअभियंता श्री. शिंदे, शाखा अभियंता जाधव, नितीन रायबोले, सरपंच ज्ञानोबा मुटकुळे, ग्रामपंचायत अधिकारी आर. बी. हेलगंड उपस्थित होते..कार्यक्रमाची सुरुवात जलदिंडीने झाली. भजनी मंडळ, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी कलश घेऊन प्रभातफेरीद्वारे गावातील प्रमुख मार्गांवरून पाण्याच्या टाकीपर्यंत जलदिंडी काढली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीस्थळी जलदेवतेच्या कलशाचे पूजन करून जल अर्पण करण्यात आले. .Jal Jeevan Mission: जलमहोत्सवात बनवडीला नामांकन.जिल्हाधिकारी गुप्ता म्हणाले, की जलजीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शनद्वारे शाश्वत, स्वच्छ व दर्जेदार पाणी उपलब्ध झाल्याने या उपक्रमाचा उद्देश साध्य झाला तसेच ‘जल तारा’योजनेअंतर्गत पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जतन करण्यासाठी पाणी पुनर्भरणाच्या उपक्रमांवर भर द्यावा. मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी जलजीवन मिशनचा उद्देश गावातील प्रत्येक कुटुंबास नळाद्वारे दरडोई ५५ लिटर स्वच्छ व दर्जेदार पाणी पुरवठा करणे हा असून तो साध्य झाल्याचे सांगितले. .आता या योजनेची देखभाल, दुरुस्ती व पाणी गुणवत्तेची जबाबदारी ग्रामस्थांची असून ही योजना ग्रामस्थांच्या मालकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या शाळा व स्मशानभूमीच्या प्रश्नांबाबतही सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.