Chhatrapati Sambhajinagar News: गंगापूर तालुक्यातील अमळनेर, गळनिंब लखमापूर व इतर गावातील शेतकऱ्यांचे जायकवाडी जलाशयाच्या पाण्यामुळे सतत होणारे पीक नुकसान व प्रलंबित पडलेली अतिरिक्त भूसंपादन कारवाई तत्परतेने व्हावी, असे आदेश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिंचन भवन छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी (ता. २४) नियामक मंडळाच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले..जायकवाडी बॅक वॉटर फुगवटा क्षेत्राच्या अतिरिक्त पाण्यामुळे असंपादित क्षेत्रातील शेती पिकांचे सतत अतोनात नुकसान होत आहे. बाधित शेतकऱ्यांनी वेळोवेळी पीक नुकसान भरपाई मोबदला व भूसंपादनासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला..Farmers Relief: बँकांनी कर्जाचे पुनर्गठन करून सहकार्य करावे. मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने त्या शेतकऱ्यांनी कुटुंबीयांसमवेत मंगळवारी (ता. २३) अमळनेर वस्ती शिवारात कडाक्याच्या थंडीत जायकवाडी धरणाच्या फुगवटा क्षेत्रांच्या गार पाण्यात दहा तास उभे राहून जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत आमदार प्रशांत बंब यांनी बुधवारी सकाळी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घडवून आणली. .Farmer Relief: महापुरात जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना ५७ कोटी रुपये मंजूर.जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दिलीप पाटील निरपळ हे ही शेतकऱ्यांच्या सोबत उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांनी मंत्री महोदयांना निवेदन दिले व १९९८ पासून पीक नुकसान भरपाई व भूसंपादनसाठी करत असलेला पाठपुरावा आणि जलसमाधी आंदोलनची व्यथा मांडल्या. मंत्री विखे पाटील यांनी धरणग्रस्त त्रस्त शेतकरी लोकांच्या समस्या समजून घेत त्यांच्याशी आस्थेवाईकपणे संवाद साधत धीर दिलासा देत न्याय देण्याची ग्वाही दिली. .लगेच सर्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करून तत्पर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्याप्रसंगी आमदार प्रशांत बंब, जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर, गोदावरी विकास महामंडळ कार्यकारी संचालक संतोष त्रिमनवार, अधीक्षक अभियंता समाधान सबिनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत संत, उपविभागीय अभियंता दीपक कुमार डोंगरे, शेतकरी संतोष टेकाळे, राधेश्याम कोल्हे, अप्पासाहेब पाचपुते, इसाभाई पठाण उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.