Amravati News: चांदूरबाजार तालुक्यातील करजगाव येथील शेतकरी भारती अरुणराव पोहोरकर यांच्या मृग बहर संत्रा बागेने यंदा अतिवृष्टीसारख्या प्रतिकूल परिस्थितीतही उल्लेखनीय उत्पादन दिले. अभिनेते भारत गणेशपुरे यांनी पोहोरकर यांच्या बागेला भेट देऊन संपूर्ण व्यवस्थापनाची पाहणी करत माहिती घेतली. .१ एकर ४ गुंठे क्षेत्रातील या बागेत एकूण १८० संत्रा झाडे असून त्यापैकी १४० झाडांना बांबू बांधणी करून फळधारणा नियंत्रित ठेवण्यात आली. मृग बहर नियोजनात पाण्याचे ताणनियंत्रण, योग्य वेळी खतांचा डोस, तसेच कीड-रोग व्यवस्थापनावर भर देण्यात आला..Orange Farming: अहिल्यानगरच्या संत्रा उत्पादकांसाठी ‘ऑरेंजव्हॅली’ .रासायनिक खतांबरोबरच ॲझोटोबॅक्टर, पीएसबीसारखी जिवाणूजन्य खते, तसेच एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापनाअंतर्गत जैविक व रासायनिक कीटकनाशके-बुरशीनाशके यांचा संतुलित वापर करण्यात आला..Orange Farming: करंजी परिसरातील शेतकऱ्यांना संत्र्यातून दिलासा.विशेष म्हणजे संत्रा ओळींमध्ये झेंडू हे आंतरपीक घेतल्यामुळे सूत्रकृमी (नेमाटोड) प्रादुर्भाव लक्षणीयरीत्या कमी झाला. यामुळे मुळांची कार्यक्षमता वाढून झाडांची वाढ व फळांची गुणवत्ता सुधारली, तसेच झेंडू फुलांची अतिरिक्त विक्रीही शक्य झाली. या तांत्रिक व्यवस्थापनाचा थेट परिणाम उत्पादनावर दिसून आला असून, यंदा पोहोरकर यांनी मृग बहर संत्रा सुमारे ७ लाख रुपयांत विक्री केला. या वेळी बाळासाहेब देशमुख, पुष्पक खापरे, मनीष गणेशपुरे उपस्थित होते..गणेशपुरे यांची शेतीभारत गणेशपुरे यांनी स्वतः अमरावती जिल्ह्यात त्यांनी पाच एकर शेती घेतली असून, यात फळबाग लागवड करण्यात आली. त्याच्या व्यवस्थापनासाठी अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांना ते भेटी देत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.