Pune News: जुन्नर वन विभागांतर्गत येणाऱ्या तालुक्यात सध्या मानव-बिबट संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर काही समाजकंटकांकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बिबट्याचे बनावट फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. .अशा अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध आता थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याचा इशारा चाकण वनपरिक्षेत्र कार्यालयाने दिला आहे..Leopard Terror: शिरूर अनंतपाळ तालुक्यात बिबट्याची दहशत?.गेल्या काही दिवसांपासून हवेली, शिरूर, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत बिबट्याचा वावर वाढला आहे. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही व्यक्ती एआय सॉफ्टवेअर आणि विविध ॲप्लिकेशन्सच्या मदतीने बिबट्याचे फोटो एडिट करत आहेत. हे बनावट फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत..Leopard Protection: बिबट्यांसाठी मालेगावला राखीव वनक्षेत्रासाठी साकडे.यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण घबराट पसरत असून प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत आहे. या प्रकाराची वन विभागाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अपरिचित किंवा संशयास्पद फोटो-व्हिडिओवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर पोलिस आणि वन विभागाची करडी नजर असल्याचेही या वेळी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे..तीन वर्षांचा कारावास आणि एक लाखाचा दंडवनरक्षक अचल गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याविषयी अफवा पसरवणे, लोकांमध्ये भीती निर्माण करणे किंवा खोटी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करणे हे कायद्याने गंभीर गुन्हे आहेत. अशा कृत्यांसाठी भारतीय न्यायसंहिता २०२३ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील तरतुदींनुसार कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस ३ वर्षांपर्यंत कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.