Ahmednagar News: उसाच्या धोकादायक वाहतुकीमुळे रस्त्यावर लहान-मोठे अपघात होत आहेत. या अपघातांत अनेक निष्पाप नागरिक जखमी आणि मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे उसाची धोकादायक वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत..जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. ऊस वाहतुकीच्या प्रश्नावर प्रशासन, शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात झाली. पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे, प्रादेशिक सहायक साखर आयुक्त संजय गोंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, श्रीरामपूरचे उपप्रादेशिक अधिकारी अनंता जोशी, शिवसेना युवा नेते अभिजित पोटे, शिवसैनिक संजय वाघ, सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते..Sugarcane Transport Rule: ऊस काटामारी रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय.पोटे म्हणाले की, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे दरवर्षी सुमारे ५० पेक्षा अधिक निष्पाप नागरिकांचे मृत्यू होत आहेत. शेकडो नागरिकांना अपघातामुळे कायमचे अपंगत्व आले आहे. साखर कारखाने जास्त टनांपर्यंत ऊस घेऊन येणाऱ्या वाहन मालकांचा सत्कार करून त्यांना बक्षिसे देतात. मग अशा वाहनामुळे रस्त्यावर अपघातात निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यास अथवा ते जखमी झाल्यास त्याची जबाबदारी साखर कारखानदार का घेत नाहीत. .Sugarcane Weighing Irregularities: उसाची काटामारी आणि अपघात रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय.सर्व कारखान्यांची शेतकी विभागाची यंत्रणा ऊस वाहणाऱ्या वाहन मालकांबरोबर वाहनांचे करार करत असते. मात्र, वाहनांचा विमा, फिटनेस आणि वाहनात केलेले फेरबदल तपासले जात नाहीत. फक्त ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक अशा वाहनातून जास्तीत-जास्त ऊस आपल्या कारखान्याला कसा कमी वेळातमिळेल, याची दक्षता घेतली जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले..जिल्हाधिकाऱ्यांनी धोकादायक ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिले आहेत. रस्त्यांची वजन पेलण्याची क्षमता १२ ते १५ टन असताना अशा रस्त्यांवरून ३० टनांचे ट्रॅक्टर, तर ५० टनांपेक्षा जास्त वजनाच्या ट्रकमधून ऊस वाहतूक होते. तसेच, ट्रॅक्टरच्या पाठीमागील भाग दोन ट्रॉलींनी जोडलेले असल्याने व त्यातप्रमाणापेक्षा जास्त ऊस असल्याने, अशी वाहने रस्त्याच्या मधोमध चालतात. उसाची कांडके ट्रॉलीच्या पाठीमागून बाहेर निघालेली असल्याने पाठीमागून येणाऱ्या दुचाकी स्वारांचा अपघात होतात..म्युझिक सिस्टिमही कारणीभूतअनेकदा ट्रॅक्टरमध्ये दणदणाटी आवाजात म्युझिक सिस्टिम सुरू असते. त्यामुळे ट्रॅक्टरचालकाला काहीही ऐकू येत नाही. त्यामुळेही अनेकदा अपघात होत असल्याची बाब या वेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.